नगर मनपा निवडणूक २०१८ : छिंदमचा अर्ज स्वीकारणा-यां अधिका-यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:29 AM2018-11-17T10:29:01+5:302018-11-17T10:29:10+5:30

महापालिका निवडणुकीत माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा उमेदवारी अर्ज स्वीकारणा-या तसेच त्याच्या अर्जावर सूचक व अनुमोदक असणा-यांच्या तोंडाला काळे फासण्याची धमकी देणा-या तरूणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagar Municipal Election 2018: threat to officials accepting Chhatham's application | नगर मनपा निवडणूक २०१८ : छिंदमचा अर्ज स्वीकारणा-यां अधिका-यांना धमकी

नगर मनपा निवडणूक २०१८ : छिंदमचा अर्ज स्वीकारणा-यां अधिका-यांना धमकी

अहमदनगर : महापालिका निवडणुकीत माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा उमेदवारी अर्ज स्वीकारणा-या तसेच त्याच्या अर्जावर सूचक व अनुमोदक असणा-यांच्या तोंडाला काळे फासण्याची धमकी देणा-या तरूणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महापालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त शहानवाज बु-हाण तडवी (वय ४३) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भावेश अशोक राऊत (रा. लाटेगल्ली, अहमदनगर) व त्याच्या इतर साथीदारांवर सरकारी कामात अडथळा, कट रचणे, निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडणे, फौजदारीपात्र अतिक्रमण आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भावेश राऊत याची एक व्हिडिओ क्लिप शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामध्ये राऊत याने श्रीपाद छिंदम याचा अर्ज स्वीकारणा-या अधिका-याला तसेच त्याच्या अर्जावर सूचक व अनुमोदक असणा-यांना त्यांच्या कार्यालयात घुसून तोंडाला काळे फासण्याची धमकी दिली आहे. छिंदम याचा निवडणुकीसंदर्भात कुणी अर्ज स्वीकारू नये, असा या क्लिपमध्ये उल्लेख आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी धमकी देणारा राऊत व त्याच्या साथीदारांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची आदेश दिला. तडवी यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे यांनी राऊत याच्या शोधासाठी पथकांना रवाना केले आहे.
पोलीस सतर्क
छिंदम याने फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला दोनवेळा शहरातून हद्दपार केले होता. छिंदम आता महापालिका निवडणुकीत उमेदवारी करत असल्याने पुन्हा काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत़ छिंदमच्या अनुषंगाने घडणा-या घडामोडींवर पोलिसांची बारिक नजर राहणार आहे.

Web Title: Nagar Municipal Election 2018: threat to officials accepting Chhatham's application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.