नगर मनपा निवडणूक : प्रभाग बारामध्ये भाजपा-रासपची साथसंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:23 IST2018-11-28T14:22:42+5:302018-11-28T14:23:00+5:30
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजपा आता येथे रासपच्या उमेदवाराला बळ देणार आहे.

नगर मनपा निवडणूक : प्रभाग बारामध्ये भाजपा-रासपची साथसंगत
अहमदनगर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजपा आता येथे रासपच्या उमेदवाराला बळ देणार आहे. या एका प्रभागातील भाजपा-रासप युतीवर खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.
खा़ गांधी यांच्या कार्यालयात याबाबत मंगळवारी सायंकाळी बैठक झाली़ यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश महासचिव बाळासाहेब दोडतले, प्रदेश सरचिटणीस नितीन धायगुडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी, ज्येष्ठ नेते सुभाष साळवे, भाजपाचे सरचिटणीस किशोर बोरा, सुनील रामदासी, विवेक नाईक, शरद बाचकर आदी उपस्थित होते़ यावेळी प्रभाग १२ मध्ये भाजप व रासप एकत्रित प्रचार करणार असल्याचे ठरले. रासपचे उमेदवार हरिभाऊ डोळसे व भाजपाचे उर्वरित ३ उमेदवार एकत्रित प्रचार करून निवडणूक लढविणार असल्याचे गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले़ प्रभाग १२ येथून भाजपाकडून उमेदवारी करत असलेले सुरेश खरपुडे यांचा अर्ज बाद झाला.