नगर-पुणे महामार्ग शंभर फूट खचला; कामरगाव रस्त्याला तळ्याचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 05:16 PM2019-10-05T17:16:38+5:302019-10-05T17:17:31+5:30
नगर-पुणे महामार्गावर कामरगाव (ता. नगर) येथील १०० फूटपर्यंतचा रस्ता खचला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ता दुरुस्त न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निंबळक : नगर-पुणे महामार्गावर कामरगाव (ता. नगर) येथील १०० फूटपर्यंतचा रस्ता खचला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ता दुरुस्त न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे .
कामरगाव रस्त्यावर बºयाच ठिकाणी रस्त्याना उतार झाला आले. दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना जीव धोक्यात घालून जाण्याची वेळ आली आहे. या भागात ३ ते ४ फूट पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथे वाहन घसरून अपघात होत आहेत. पावसाळ्यात या परिसरात नेहमीच पाणी साचल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. खचलेल्या भागाची दुरुस्ती करून वाहत्या पाण्याला योग्य उतार द्यावा व लोकांचे प्राण वाचवावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. अपघात झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची दुरूस्ती करणार का? असा संतप्त सवाल रामशेठ ठोकळ, शिवाजी जाधव, तबाजी साठे, पप्पू साठे, कैलास जंगम यांनी केला आहे. येत्या काही दिवसात दुरुस्ती न झाल्यास व अपघात घडला तर रास्ता रोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा तुकाराम कातोरे युवा नेते अंकुश ठोकळ यांनी दिला आहे.