नगर अर्बन बँकेची १०० कोटी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:53+5:302021-07-07T04:26:53+5:30
राबविण्यात येत आहे, असे नगर अर्बन बँकेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. नगर अर्बन को-ऑप बँकेने मागील एक वर्षांमध्ये कर्ज ...
राबविण्यात येत आहे, असे नगर अर्बन बँकेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नगर अर्बन को-ऑप बँकेने मागील एक वर्षांमध्ये कर्ज व्याजदरांमध्ये तब्बल अडीच टक्के कपात केली आहे. १११ वर्षांची गौरव शाली परंपरा असलेल्या बँकेच्या निर्णयामुळे लाखो कर्जदारांना याचा फायदा होणार असून मासिक हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मार्च महिन्यामध्ये रेपो रेट ०. ७५ टक्के व मे २०२० मध्ये ०.४० टक्के कपात केली आहे. १ ते १० वर्षाच्या कालावधीसाठी अखंड ठेव योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. निर्धारित व्याजदरापेक्षा ०.१५ ते ०.२५ टक्के अधिक व्याजदर ठेवींवर देण्यात येत आहेत. एक लाखापर्यंत ठेवींसाठी असलेले विमा संरक्षण आता ५ लाखापर्यंतच्या ठेवींसाठी वाढविण्यात आलेले आहे. आयकर भरणाऱ्या बँकेच्या सर्व ग्राहक व सभासद व ठेवीदारांना बँकेचे टॅक्स सेव्हिंग सर्टिफिकेट ठेव योजनेत गुंतवणूक करून आयकरांमध्ये सवलत मिळवता येणार आहे. नगर अर्बन को-ऑप बँकेच्या समितीने दोन वर्ष १ दिवस ते ३ वर्षापर्यंत व्याजदर ६.४५ टक्के निर्धारित केला आहे. तसेच इतर मुदतबंद ठेवीवरील व्याजदराचीही घोषणा केली आहे. ठेवीदार व सभासदांनी या योजनांचा, सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. (वा. प्र.)