नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरण; दोघा आरोपींना ५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी
By अण्णा नवथर | Published: February 2, 2024 03:57 PM2024-02-02T15:57:42+5:302024-02-02T15:58:30+5:30
नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने माजी संचालक अनिल कोठारी व मनीष साठे, आशा दोघांना अटक केली आहे.
अहमदनगर : नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींना न्यायालयाने 5 फेब्रुवारी पर्यंत ची पोलीस कोठडी दिली आहे.
नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने माजी संचालक अनिल कोठारी व मनीष साठे, आशा दोघांना अटक केली आहे. यातील आरोपी मनीष साठे याचे नावे भिंगार शाखेमध्ये खाते आहे. त्यावर अनेक संशयास्पद एन्ट्री झालेल्या दिसतात. तसे फॉरेन्सिक ऑडिटमध्येही नमूद आहे.
याबाबतची माहिती आरोपीकडून मिळणे आवश्यक आहे. परंतु आरोपी याबाबत कुठलीही माहिती देत नाही. तसेच दुसरा आरोपी अनिल कोठारी हा गेल्या पंधरा वर्षापासून या बँकेत संचालक म्हणून कार्यरत आहे. हा एकूण २९१ कोटींचा घोटाळा असून, यामध्ये १०५ आरोपींचा समावेश आहे. इतर आरोपी फरार आहेत. अनिल कोठारी व मनीष साठी, या दोघांनाही आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्यावतीने मंगेश दिवाणी यांनी केली.
आरोपीच्या वतीने ही किंवा करण्यात आला पोलिसांकडून गेल्या अनेक दिवसांपासून हा तपास सुरू आहे.मात्र त्यात कुठल्याही प्रकारची प्रगती नाहीm आरोपींच्या खात्यावर जे ट्रांजेक्शन झालेले आहे. त्याबाबत यापूर्वीच माहिती दिलेली आहे. तसेच आरोपींच्या मालमत्ता ही इथेच आहेत. असे असतानाही पोलिसांना पोलीस कोठडी कशाला हवी असा प्रश्नही यावेळी आरोपींच्या वकिलांनी केला होता.