मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
By अण्णा नवथर | Published: May 13, 2024 09:00 AM2024-05-13T09:00:35+5:302024-05-13T09:03:38+5:30
मतदान करू देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर नगर शहरातील सावेडी उपनगरातील काही मतदारांची नावे मतदार यादी मध्ये चुकीची आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आडनाव चुकीचे असल्यामुळे दोघा मतदारांना मतदान करता आले नाही.
सावेडी उपनगरातील प्रफुल्ल भौरीलाल खंडेलवाल व त्यांच्या पत्नी या सावेडी उपनगरातील समर्थ विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आले होते. परंतु मतदार यादीमध्ये त्यांचे आडनाव झालानी, असे असल्यामुळे त्यांना मतदान केंद्रातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यांनी काही प्रतिनिधींशी कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. परंतु खंडेलावाल ऐवजी झालानी, असे आडनाव असल्यामुळे त्यांना मतदान करताना अडचण निर्माण झाली. त्यांच्या आधार कार्डवरदेखील खंडेलवाल असे आडनाव आहे. परंतु तरी देखील त्यांना मतदान करू देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार देण्यात आला.