समृध्दी महामार्गाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:30 PM2018-11-15T16:30:52+5:302018-11-15T16:30:57+5:30
राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृध्दी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व हिंदू रक्षक समिती यांनी तहसीलदारांना निवेदन दिले तहसिलदार नसल्याने अव्वल कारकून जयवंत भांमरे यांनी निवेदन स्वीकारले.
कोपरगाव : राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृध्दी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व हिंदू रक्षक समिती यांनी तहसीलदारांना निवेदन दिले तहसिलदार नसल्याने अव्वल कारकून जयवंत भांमरे यांनी निवेदन स्वीकारले.
महाराष्ट्राचा सर्वात मोठा महामार्ग समृध्दी महामार्ग म्हणून ओळखला जात आहे. परंतु या महामार्गला धर्मवीर छत्रपती शंभूराजे असे नाव देण्यात यावे. कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज की जय असे घोषणाने तहसील कार्यालय दणाणून सोडला होता. १५ दिवसात जर समृद्धी महामार्गाला महाराजांचे नाव दिले नाही तर मराठा क्रांती मोर्चा व हिंदू रक्षक समितीकडू्न तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी अनिल गायकवाड, विकास आढाव, विनय भगत, अक्षय अंग्रे, करन पाटील, सनी पंडोरे, सागर जामदा, गणेश निकम आदी उपस्थित होते .