नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 01:29 PM2019-09-18T13:29:06+5:302019-09-18T13:29:42+5:30
जैन धर्मात नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा समजला जातो. प्रत्येक धर्मात मंत्र असतात. त्या मंत्रात अध्यात्मिक कल्याण करण्याची ताकद असते. मंत्रशक्तीचा वापर करुन आपल्या जीवनात सुख निर्माण करु शकतो.
सन्मतीवाणी
जैन धर्मात नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा समजला जातो. प्रत्येक धर्मात मंत्र असतात. त्या मंत्रात अध्यात्मिक कल्याण करण्याची ताकद असते. मंत्रशक्तीचा वापर करुन आपल्या जीवनात सुख निर्माण करु शकतो.
जैन धर्मात नवकार, हिंदू धर्मात गायत्रीमंत्र, बौध्द धर्मात त्रिथरा सुत्र, इस्लाममध्ये अल्लाह हो अकबर असे मंत्र आहेत. या मंत्रावर श्रध्दा ठेवली तर त्यापासून निश्चित फल प्राप्ती होते. भारत देश हा विविध धर्म, संस्कृतीने नटलेला देश आहे. भारतीय संस्कृतीत मंत्र शक्तीबद्दल परदेशात आकर्षण, उत्सुकता आहे. ज्याच्याकडे धन, दौलत, संपत्ती आहे, पण नवकार मंत्र नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. पण जो गरीब, दु:खी आहे पण जो नवकार मंत्राची आराधना करतो तो सर्वात सुखी माणूस समजावा. तो कधीही दु:खी नसतो.
नवकार मंत्र हा प्राणापेक्षा प्रिय मानला जातो. अध्यात्मिक उन्नतीकरीता मंत्र शक्तीचा वापर करावा. मंत्रामुळे पुण्य लाभते. नवकार हा परिपूर्ण मंत्र आहे. बुध्दी स्थिर व्हावी म्हणून जप केला पाहिजे. या मंत्रामध्ये ६८ अक्षरे आहेत. त्याची बेरीज १४ आणि त्याची बेरीज ५ होते. या मंत्राच्या शक्तीबद्दल काही जणांनी प्रबंध लिहिले आहेत. नमोकार मंत्रावर श्रध्दा ठेवली तर जीवनाचे कल्याण होईल.
- पू. श्री. सन्मती महाराज