नेवासा बाजार समितीच्या सभापतीपदी नंदकुमार पाटील, उपसभापती नवथर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 05:03 PM2023-05-29T17:03:26+5:302023-05-29T17:04:35+5:30
नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार शंकरराव गडाख गटाने सर्व १८ जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले होते.
नेवासा (जि. अहमदनगर) : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नंदकुमार पाटील तर उपसभापतीपदी नानासाहेब नवथर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार शंकरराव गडाख गटाने सर्व १८ जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले होते.
सोमवारी निवडणुक निर्णय अधिकारी गोकुळ नांगरे यांच्या उपस्थित निवड प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी नंदकुमार पाटील तर उपसभापती पदासाठी नानासाहेब नवथर यांचे अर्ज दाखल झाले.त्यामुळे दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर आमदार गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार पांडुरंग अभंग व ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख यांच्या हस्ते नवीन पक्षाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित संचालक अर्जुन नवले, अमृत काळे, हरीशचंद्र पटारे, अरुण सावंत, मीराबाई ढोकणे, अरुण शिंदे, संगिता सानप, अश्विनी काळे, सुंदराबाई ढवाण,बाबासाहेब आखाडे, बाळासाहेब दहातोंडे, सुनील धायजे, गणेश भोरे, संतोष मिसाळ, दौलतराव देशमुख, रमेश मोटे यांच्यासह पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगूने, कडूबाळ कर्डिले,तुकाराम नवले उपस्थित होते.
पालकमंत्री विखे यांनी ताकद देवून माजी आमदार मुरकुटे व लंघे यांना या निवडणुकीत अपयश आले. मागील बाजार समितीच्या निवडणुकीपेक्षा आमदार गडाख गटाचे मताधिक्य वाढल्याने सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा आमदार गडाख यांच्या बाजूने भक्कमपणे उभी राहिली आहे.
विरोधांकांनी केलेल्या आरोपाची दखल न घेता आमदार गडाख यांनी मतदाराशी त्यानी थेट संपर्क करत सावंद साधला. जिल्ह्यात व राज्यात मतदारांना सहली,जादूचे प्रयोग असे वेगवेगळे प्रकार झाले पण नेवासा बाजार समिती याला अपवाद ठरली.गडाख यांनी सर्वसामान्य लोकांना उमेदवारी दिली अगदी छोट्या गावातून उमेदवार पुढे केले,सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिले.गावातील राजकीय वैर मिटवले ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी गावात ग्रामपंचायत,सोसायटी यात दुसऱ्यांना संधी देऊन गावात राजकीय हस्तक्षेप करू नये याचा शब्दच घेतला व निवडून आल्यावर संघटना बांधावी असेही सांगितले.
मतदानाच्या आधी चार दिवस भाजपच्या पॅनल मधील उमेदवाराने आमदार शंकरराव यांच्या उपस्थितीत प्रवेश करून मुरकुटे यांना धक्का दिला याची मोठी चर्चा भाजपच्या पदाधिकाऱ्यांत झाली
पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणूका असल्याने ही विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिली गेली भाजपच्या उमेदवारी वरून लंघे व मुरकुटे यांच्यात मोठी रस्सीखेच आहे तर गडाख हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे निश्तिच आहे. गडाख यांनी आतापासूनच तयारी चालू केली आहे.