नॅनो युरिया कृषी उत्पादन वाढीसाठी आविष्कार ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:16 AM2021-05-29T04:16:43+5:302021-05-29T04:16:43+5:30

नॅनो युरियाचे महत्त्व आणि उपयोग या विषयावरील इफकोने आयोजित केलेल्या ऑनलाईन वेबिनारमध्ये डॉ. पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी ...

Nano urea will be invented to increase agricultural production | नॅनो युरिया कृषी उत्पादन वाढीसाठी आविष्कार ठरेल

नॅनो युरिया कृषी उत्पादन वाढीसाठी आविष्कार ठरेल

नॅनो युरियाचे महत्त्व आणि उपयोग या विषयावरील इफकोने आयोजित केलेल्या ऑनलाईन वेबिनारमध्ये डॉ. पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी डॉ. रमेश रालिया, महाप्रबंधक, नॅनो टेक्नॉलॉजी, इफको कलोल व संशोधक, सेंट लुईस वॉशिंग्टन विद्यापीठ, अमेरिका, योगेन्द्र कुमार, विपणन संचालक, इफको, नवी दिल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, कृषी क्षेत्रापुढे आज अनेक आव्हाने आहेत. आपल्या देशात सरासरी १३० किलो प्रति हेक्टरी एवढा युरियाचा वापर होत असतो. वर्षभरात सुमारे ५० लाख टन युरियाची आपल्याला आवश्यकता आहे. परंतु नॅनो युरियामुळे आयातीवरील खर्च कमी करता येईल. याशिवाय युरिया मात्राची परिणामकारकता वाढवून पीक उत्पादनासाठी याची मदत होईल. सुमारे ९४ वेगवेगळ्या पिकांवरील प्रयोग करून आणि अकरा हजार शेतकऱ्यांच्या शेतावर या नॅनो युरियाची प्रात्यक्षिके घेऊन हे उत्पादन तयार करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि इफको यांच्यातील समन्वयाने नॅनो खत व्यवस्थापनातील तंत्रज्ञान तयार करण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: Nano urea will be invented to increase agricultural production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.