नगरमध्ये राष्ट्रवादी, भाजपाच्या तीन आमदारांवर खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 06:19 AM2018-04-09T06:19:07+5:302018-04-09T06:19:22+5:30
शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार पितापुत्र संग्राम व अरुण जगताप, तसेच भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर : शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार पितापुत्र संग्राम व अरुण जगताप, तसेच भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी आ. संग्राम जगताप व इतर काही आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. हत्येच्या प्रकारानंतर अहमदनगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शिवसेनेने रविवारी जिल्हा बंद पाळला.
>पोलीस स्टेशनची तोडफोड
आ. संग्राम जगताप यांना अटक केल्यानंतर, शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केली़ पोलिसांनी लाठीमार करत, २२ जणांना अटक केली़ त्यांना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली.
सेनेचे तीन मंत्री शहरात दाखल
पर्यावरणमंत्री रामदास कदम व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी नगरला येऊन घटनेची माहिती घेतली. हत्येची जबाबदारी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असेही कदम म्हणाले, तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दोघा शिवसैनिकांवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मारेकरी हजर मुख्य मारेकरी संदीप गुंजाळ शनिवारी रात्री पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला़ त्याने हत्येची कबुली दिली़