कोल्हे कारखान्याचा देशपातळीवर सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:50+5:302021-07-07T04:25:50+5:30

कोपरगाव : देशात साखर आणि उपपदार्थ निर्मितीत सर्वोच्च पातळीवर अग्रगण्य असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचा केंद्र शासनाच्या अर्थ ...

National honor to the fox factory | कोल्हे कारखान्याचा देशपातळीवर सन्मान

कोल्हे कारखान्याचा देशपातळीवर सन्मान

कोपरगाव : देशात साखर आणि उपपदार्थ निर्मितीत सर्वोच्च पातळीवर अग्रगण्य असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचा केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने जीएसटी कर प्रणालीत नियमित भरणा केला. त्याबद्दल कारखान्याचा देशपातळीवर सन्मान करण्यात आला.

सीबीआयसी विभागाचे अध्यक्ष एम. अजित कुमार यांनी सर्टिफिकेट ऑफ ॲप्रोप्रिएशन बेस्ट ॲवॉर्ड प्रमाणपत्र देऊन सन्मान केला असल्याची माहिती अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली. राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कारखान्यात संजीवनीचा समावेश आहे.

कोल्हे म्हणाले, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी साखर कारखान्याने प्रत्येक हंगामातील संकटावर मात करीत यशस्वी मार्गक्रमण सुरू ठेवले आहे. थेट उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती करणारा देशातील पहिलाच कोल्हे कारखाना आहे. केंद्र शासनाने २०१७ पासून जीएसटी करप्रणाली लागू केली. तेव्हापासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत कोल्हे कारखान्याने यात अत्यंत सूक्ष्म माहितीचे संकलन करून संगणकीय पद्धतीने विहीत नमुन्यात वेळेत जीएसटी भरून शासनास सहकार्य केले आहे. त्याबद्दल भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाने गौरव केला आहे. या पुरस्कारात कारखान्याचे सर्व सन्माननीय सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी अशा सर्वांचा वाटा आहे. कोल्हे कारखान्यास आजवर शासकीय-निमशासकीय स्तरावरील २० विविध पारितोषिके मिळालेली आहेत.

Web Title: National honor to the fox factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.