पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:39+5:302021-07-07T04:26:39+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी प्रणित भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी प्रणित भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत विक्रमी दरवाढ केलेली आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता या महागाईने होरपळलेली आहे. एकीकडे देशात सुमारे एक ते दीड वर्षापासून कोरोना महामारीचे मोठे संकट कोसळले आहे. त्यातच सर्वसामान्य जनतेचा रोजगार गेलेला आहे. जनतेच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकीकडे भरमसाठ महागाईने डोके वर काढलेले असून त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. महागाईमुळे सर्वत्र जनतेत चिंता वाढली आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने त्वरित पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घ्यावी. सर्वसामान्य जनतेचा विचार करून त्यांना दिलासा द्यावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस राहाता तालुक्याच्या वतीने तहसीलदार कुंदन हिरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला.
याप्रसंगी गणेशचे माजी संचालक भगवानराव टिळेकर, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस रणजीत बोठे, महिला तालुका अध्यक्षा अलका कोते, शहर सरचिटणीस शेखर जमधडे, अन्सारभाई दारुवाले, निळवंडे कृती समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मंगेश कुलकर्णी, युवकचे योगेश निर्मळ, अभिजीत बोठे, अमोल बनसोडे, महिला दक्षता कमिटी अध्यक्षा शोभा वर्पे, महिला उपाध्यक्षा पद्माताई जाधव, शशिकांत कुमावत, सोपानराव गिधाड, विद्यार्थी काँग्रेसचे जाईद दारुवाले, शहर उपाध्यक्ष समीर बेग व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.