संशोधनवृत्तीबरोबर निसर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:21 AM2021-01-20T04:21:08+5:302021-01-20T04:21:08+5:30

शिक्षण प्रसारक संगमनेर महाविद्यालयात राष्ट्रीय भूगोल दिनानिमित्त ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड ...

Nature conservation can be inspired with research | संशोधनवृत्तीबरोबर निसर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळू शकते

संशोधनवृत्तीबरोबर निसर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळू शकते

शिक्षण प्रसारक संगमनेर महाविद्यालयात राष्ट्रीय भूगोल दिनानिमित्त ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड होते. भूगोल विभाग प्रमुख प्रा.रवींद्र गायकवाड उपस्थित होते.

आपल्या परिसरात हरिचंद्रगड, रोहिदास शिखर, तारामती शिखर, अमृतेश्वर, रतनगड, प्रवरा व मुळा उगम, रंधा-धबधबा, लवणस्तंभ, अजोबा पर्वत असे कितीतरी भौगोलिक भू-रूपे या परिसराचे वैशिष्ट्य आहे. आपल्या परिसराचा आर्थिक विकास साधताना, जर आपण या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग पर्यटनासाठी केला, तर निश्चितच या भागाच्या विकासाला चालना मिळेल. विद्यार्थ्यांनी भौगोलिक शिक्षण घेत असताना आपल्या परिसरातील सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही शेवाळे म्हणाले.

प्रास्ताविक प्रा.गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन सुजाता कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील प्रा.संदीप देशमुख, प्रा.संजय नवले, प्रा.कोमल सिंग, तसेच शिक्षकेतर सहकारी सचिन चौधरी, किशोर गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Nature conservation can be inspired with research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.