नमो गुरूजींच्या क्लासला पावणे नऊ लाख विद्यार्थी

By Admin | Published: September 6, 2014 11:45 PM2014-09-06T23:45:07+5:302023-06-26T14:36:38+5:30

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यातील ५ हजार ६६ शाळांतील ८ लाख ८३ विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.

Nau Guruji's class is worth nine lakh students | नमो गुरूजींच्या क्लासला पावणे नऊ लाख विद्यार्थी

नमो गुरूजींच्या क्लासला पावणे नऊ लाख विद्यार्थी

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यातील ५ हजार ६६ शाळांतील ८ लाख ८३ विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली. अनेक शाळांत पतंप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची चांगलीच धावपळ झाली. मात्र, त्यानंतरही ऐवढ्या मोठ्यासंख्याने विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.
शिक्षक दिनाचे औचित्यसाधून पंतप्रधान मोदी यांनी एकाच वेळी देशातील लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात त्यांच्या भाषणासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.
सुरूवातीला विद्यार्थी आणि शिक्षकांना उपस्थित राहण्यास सक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा शिक्षण संचालकांनी आदेश काढत शाळेतील उपस्थितीचा विषय ऐच्छीक असल्याचे पत्र पाठविले होते.
मात्र, उपस्थितीचा अहवाल घेण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा शुक्रवारी दुपारी सुरू होत्या. त्या ठिकाणी मोदी यांचे भाषण ऐकण्याची सोय करण्यात आली होती. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी होत्या. पण त्यावर मात करण्यात आली होती.
(प्रतिनिधी)
शाळा आणि कंसात विद्यार्थ्यांची उपस्थिती
अकोले ५३१ (६२९८५), जामखेड २१७ (२९४१९), कर्जत ३५३ (४४९३४), कोपरगाव २५८ (४९५८१), नगर ३४० (५५९८१), पारनेर ४३८ (४६६७४), नेवासा ३४४ (४९६२४), पाथर्डी ३९५ (५६५१२), राहाता २५२ (५५१८५), राहुरी ३५३ (४५५२६), संगमनेर ५०९ (८४८१४), शेवगाव ३०७ (५००३५), श्रीगोंदा ३४६ (४७००१), श्रीरामपूर २२८ (५०५६३), मनपा १९५ (७९४०१).

Web Title: Nau Guruji's class is worth nine lakh students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.