निघोजचे आॅनर किलिंग :सहा महिन्यांपासून दोन्ही कुटुंब तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:18 PM2019-05-07T12:18:52+5:302019-05-07T12:19:22+5:30

दोन वर्षांपूर्वी कै. संदीप वराळ हत्याकांडाने हादरलेले निघोज आता आॅनर किलिंगच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. आंतरजातीय विवाहातून पित्यानेच मुलीचा खून केल्याची थरारक आणि तेवढीच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने निघोज नि:शब्द झाले आहे.

Nazar's Anner Killing: The family tension for six months | निघोजचे आॅनर किलिंग :सहा महिन्यांपासून दोन्ही कुटुंब तणावात

निघोजचे आॅनर किलिंग :सहा महिन्यांपासून दोन्ही कुटुंब तणावात

भास्कर कवाद
निघोज : दोन वर्षांपूर्वी कै. संदीप वराळ हत्याकांडाने हादरलेले निघोज आता आॅनर किलिंगच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. आंतरजातीय विवाहातून पित्यानेच मुलीचा खून केल्याची थरारक आणि तेवढीच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने निघोज नि:शब्द झाले आहे. मुलीचा मृत्यू झाल्याची वार्ता येताच शहरावर शोककळा पसरली.
पारनेर तालुक्यातील निघोज गावामध्ये उत्तरप्रदेश व बिहारसह परभणी, जालना, बीड, सोलापुर, लातूर या जिल्ह्यातून गवंडी व शेतमजुरीसाठी अनेक कुटुंब स्थलांतरित झालेली आहेत. अशा स्थलांतरित कुटुंबातील सदस्यांची संख्या पाच हजारांच्या आसपास आहे. रणसिंग कुटुंब हे अनेक वर्षापासून व तर भरतीया कुटुंब तीन-चार वर्षांपासून निघोजमध्ये स्थायिक आहे. रणसिंग कुटुंब गवंडी काम करते, तर भरतीया कुटुंब शेतमजुरी करीत होते. या दोन्ही कुटुंबातील मंगेश आणि रुक्मिणी यांचे प्रेम जुळले आणि त्यांनी विवाह केला. घरच्यांच्या विरोधात विवाह केल्याने दोन्ही कुटुंबातील संबंध सहा महिन्यापासून तणावग्रस्तच बनले. दोघांमध्ये स्वयंपाक करण्यावरुन भांडण झाले. रुक्मिणी ही माहेरी गेली. मंगेश हा रुक्मिणीला आणण्यासाठी गेला असता मंगेश व मुलीची आई, वडील, काका, मामा यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. मंगेशसोबत जाऊ नको, असा हट्ट रुक्मिणीच्या नातेवाईकांनी धरला आणि दुसरीकडे रुक्मिणीने मंगेशचा हात घट्ट धरला. यावेळी रागाच्या भरात मुलीच्या नातेवाईकांनी दोघांना मारहाण केली. घरात त्यांना कोंडले आणि घरातच रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यावर कळस म्हणजे रुक्मिणीच्या नातेवाईकांनी घर बंद करुन ते निघून गेले. आरडाओरडा झाल्याने शेजारच्यांनी घर उघडून दोघांना सरकारी रुग्णवाहिकेतून पुणे येथे ससून रुग्णालयात हलविले. ही घटना निघोजमध्ये मध्यवस्तीत घडली. त्यामुळे निघोजकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

पोलिसांसमोर आव्हान
आंतरजातीय विवाहानंतर दोन्ही कुटुंबामध्ये समन्वय न राहिल्यास अशा घटना रोखणेही पोलिसांसमोर आव्हानच बनले आहे. पोलीस प्रशासनाबरोबर ग्रामपंचायतीकडेही निघोजमध्ये वास्तव्यास असणाºया बाहेरील राज्यातील व्यक्तिंची माहिती असणे आता गरजेचे झाले आहे. अन्यथा निघोजमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे ग्रामस्थ सांगत आहेत.

Web Title: Nazar's Anner Killing: The family tension for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.