अहमदनगर महापालिका : राष्ट्रवादीकडून अविनाश घुले, समद खान यांची स्थायी समितीवर नियुक्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:43 PM2021-02-10T13:43:05+5:302021-02-10T13:44:40+5:30

महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविनाश घुले समद खान यांची तर भाजपकडून वंदना विलास साठे व रवींद्र बारस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेकडून रिता भाकरे सचिन शिंदे परसराम उर्फ प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

NCP appoints Avinash Ghule Samad Khan to Standing Committee | अहमदनगर महापालिका : राष्ट्रवादीकडून अविनाश घुले, समद खान यांची स्थायी समितीवर नियुक्ती 

अहमदनगर महापालिका : राष्ट्रवादीकडून अविनाश घुले, समद खान यांची स्थायी समितीवर नियुक्ती 

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविनाश घुले, समद खान यांची तर भाजपकडून वंदना विलास साठे, रवींद्र बारस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेकडून रिता भाकरे सचिन शिंदे परसराम उर्फ प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 बसपकडून गटनेते मुदस्सर शेख यांनी मागील प्रमाणेच यावेळीही स्वतःचेच नाव बंद पाकिटातून दिल्याने त्यांच्या नावाची घोषणा सभागृहात करण्यात आली.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी महापालिकेत स्थायी समिती सदस्य नियुक्तीसाठी सभा झाली. या सभेत राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी बंद पाकिटातून त्यांच्या पक्षाचे घुले व  खान यांची नावे सुचविली. त्यानंतर शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी शिंदे, गायकवाड आणि भाकरे यांच्या नावाचे पाकीट दिले. हे पाकीट महापौर वाकळे यांनी वाचून दाखवत सदस्यांची नावे जाहीर केली.

 भाजपकडून उपमहापौर मालन ढोणे यांनी त्यांच्या पक्षाचे दोन सदस्यांची नावे सुचविली. बसपा कडून गटनेते मुदस्सर शेख यांनी स्वतःचे नाव सुचविल्याने आश्विनी जाधव यांचा पत्ता कट झाला आहे. राष्ट्रवादीकडून कुमार वाकळे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु ऐन वेळी राष्ट्रवादीने सदस्य बदलून अविनाश घुले यांना संधी दिली आहे.

Web Title: NCP appoints Avinash Ghule Samad Khan to Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.