राष्ट्रवादीने टांगले आयुक्तांच्या दालनाबाहेर बल्ब
By Admin | Published: May 6, 2017 03:00 PM2017-05-06T15:00:19+5:302017-05-06T15:00:19+5:30
नगर शहरातील पथदिवे नादुरुस्त असल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आज महापालिका आयुक्त दिलीप गावडे यांच्या दालनाबाहेर विद्युत दिव्यांची माळ लटकावून निषेध केला.
आॅनलाइन लोकमत
अहमदनगर, दि़ ६ - नगर शहरातील पथदिवे नादुरुस्त असल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आज महापालिका आयुक्त दिलीप गावडे यांच्या दालनाबाहेर विद्युत दिव्यांची माळ लटकावून निषेध केला.
दिवे दुरुस्त होत नाही व दुरुस्तीचे सामान घेण्यासाठी मनपाकडे निधी नाही, अशा तक्रारी यावेळी नगरसेवकांनी केल्या. या आंदोलनात अविनाश घुले, कुमार वाकळे, संपत बारस्कर, अरिफ शेख, निखील वारे सहभागी झाले होते.