सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा जामखेड तहसीलवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:48 PM2017-12-08T13:48:37+5:302017-12-08T13:50:36+5:30
जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या व इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला.
जामखेड : जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या व इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला.
सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, विषारी औषध फवारणीमुळे बळी पडलेल्या शेतक-यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी, मराठा, धनगर व मुस्लिम समाजास तात्काळ आरक्षण लागू करावे, पेट्रोल, डिझेल व गॅस यांच्या किंमती तात्काळ कमी कराव्यात, शेतक-यांना पूर्ण दाबाने व पूर्ण वेळ वीज द्यावी, शेतमालाला हमी भाव मिळावा, वीज बिल माफ व्हावे, बोंड आळीमुळे कापूस उत्पादक शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान मिळावे, अशा विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात कपील पवार, दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, शरद शिंदे, शहाजी राळेभात, विश्वनाथ राऊत, प्रशांत राळेभात, योगेश राळेभात, नरेंद्र जाधव, प्रदीप पाटील, समीर पठाण, राजेंद्र गोरे, अमोल गिरमे, अमित जाधव, पवनराजे राळेभात, विकास राळेभात, गणेश हगवणे, सुरेश भोसले, मयुर डोके, महालिंग कोरे आदींनी सहभाग घेतला.