शरद पवारांनी 'एक मराठा लाख मराठा'ची घोषणा द्यायला हवी; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 07:29 PM2023-11-16T19:29:37+5:302023-11-16T19:32:00+5:30
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार शरद पवार यांना टोला लगावला.
अहमदनगर- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. तर दुसरीकडे खासदार शरद पवार यांचा एक दाखला व्हायरल होत आहे, यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता यावरुन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार शरद पवार यांना टोला लगावला आहे.
"राजे जिंदगीत असं म्हणूच शकत नाही"; सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांना विश्वास
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या इशाऱ्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती लक्ष देतात हे माहित नाही. पवार साहेबांच्या जातीवर सध्या प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवस झाले त्यावर चर्चा सुरू आहे.ते म्हणतात मी जातीच राजकारण करत नाही. त्यांनी आता गर्वसे हम मराठा है नाहीतर 'एक मराठा लाख मराठा'ची घोषणा करावी म्हणजे हा प्रश्न संपून जाईल, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
'विखे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत त्यांनी मुख्यमंत्री असताना मोठे निर्णय घेतले आहे. राज्याची धुरा त्यांच्या हातातच आहे. त्यामुळे ते केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्याचा प्रश्नच येत नाही, असंही विखे पाटील म्हणाले.
"राजे जिंदगीत असं म्हणूच शकत नाही"
जरांगेच्या सातारा येथील सभेवरून वाद निर्माण झाले आहेत. साताऱ्यातील शिवतीर्थ इथं मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असल्याचे बोलले जाते. मात्र, जरांगे पाटलांनी साताऱ्यात अन्यत्र सभा घ्यावी परंतु शिवतीर्थ इथं सभा घेऊ नये असं मराठा आंदोलन तेजस्विनी चव्हाण यांनी म्हटलं आहे.
साताऱ्यात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. मात्र, दोन्ही राजेंकडून साताऱ्यातील या कार्यक्रम घेऊ नये असं म्हटलं जातय, यासंदर्भातील प्रश्न जरांगे यांना विचारण्यात आला होता. त्यावर, हे हे.. असं होऊच शकत नाही. राजे आमचं दैवत आहे भाऊ... ती राजगादी आहे, लेकरांवरती महाराष्ट्रातील गोरगरिबांवरती साताऱ्याच्याच मायेचा हात आहे. राजे कार्यक्रम घेऊ नका म्हणणार असं होऊच शकत नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. दौंडमध्ये पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी साताऱ्यातील सभेसंदर्भात भाष्य केलं.