अहमदनगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 02:02 PM2018-10-07T14:02:05+5:302018-10-07T14:02:25+5:30
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून, विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली़ त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात असल्याने जिल्ह्यातील राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून, विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली़ त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात असल्याने जिल्ह्यातील राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील पक्ष कार्यालयात नगर जिल्ह्यातील शिर्डी व अहमदनगर लोकसभेसाठीची जिल्ह्यातील नेत्यांची बैठक पार पडली़ या बैठकीत दक्षिण नगर जिल्ह्यातील नेत्यांनी लोकसभेची उमेदवारी आमदार अरुण जगताप यांना देण्याची मागणी केली़ आमदार राहुल जगताप, माजी आमदार दादा कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, बाळासाहेब जगताप, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, शहराध्यक्ष माणिक विधाते, राजेंद्र कोठारी, सुजित झावरे आदी बैठकीला उपस्थित होते़ पक्षनिरीक्षक दिलीप वळसे यांनी आठ दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार अरुण जगताप यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली होती़ याबाबत आमदार जगताप यांच्या संपर्क कार्यालयात दोन तास चर्चा झाली़ त्यावर मुंबई येथे झालेल्या बैठकीतही चर्चा झाली असून, जिल्ह्यातील नेत्यांनी आमदार अरुण जगताप यांना नगर दखिण लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली़ याचबरोबर प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवाराची मागणी केली आहे.