राष्ट्रवादीच्या आमदाराची शिपायास मारहाण, गाडी हळू चालवा म्हणाल्याचा आला राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:14 AM2020-09-19T10:14:39+5:302020-09-19T10:16:56+5:30
राजूर ( जि. अहमदनगर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले विधानसभा सदस्य आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपणाला मारहाण केल्याची तक्रार खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे शिपाई रामदास लखा बांडे यांनी राजूर पोलीस स्टेशनला केली आहे. या प्रकरणी लहामटे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी( दि. १७ सप्टेंबर) तक्रारदार हा खडकी बुद्रुक दुपारी १२. ३० वाजण्याच्या सुमारास आपल्या गावात दत्त मंदिराजवळ पायी जात होते. यावेळी मागून आमदार डॉ . किरण लहामटे यांची गाडी आली आणि जोरात येऊन कट मारून गेली. त्यावेळी आम्हाला वाटले पर्यटक आहेत, म्हणून गाडी हळू चालवा असे ओरडून सांगितले. त्या गोष्टीचा राग येऊन आमदार लहामटे यांनी गाडी थांबवून गाडीच्या खाली उतरले व म्हणाले, मला ओळखले का ? असे म्हणून त्यांनी मारहाण करून मला शिवीगाळ केली व गाडीत बसून निघून गेले. यावेळी त्याच्यासोबत मनोहर सखाराम भांगरे होते. राजूर पोलिसांनी रखमा बांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार डॉ लहामटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा ( रजि . क्रमांक १२८३/२० भादंवि ५०४. ५०६ ) दाखल केला आहे.
----
गुरुवारी दुपारी लव्हाळीला चाललो होतो. खडकीत ही व्यक्ती माझ्या वाहनाला आडवी आली. ती व्यक्ती दारू पिलेली होती. आडवे येऊनही त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. मी वाहनातून उतरून त्याच्यावर रागावलो आता तरी सुधार अशी खडक समज देत मी निघून गेलो. मात्र एका दारू पिणाऱ्याची बाजू घेऊन कोणी राजकारण करत असेल तर ते चुकीचे आहे.
डॉ. किरण लहामटे, आमदार