सभापतिपदासाठी राष्ट्रवादीतच रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:21 AM2021-02-10T04:21:42+5:302021-02-10T04:21:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या नियुक्तीसाठी बुधवारी सभा होत असून, सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे अविनाश घुले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या नियुक्तीसाठी बुधवारी सभा होत असून, सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे अविनाश घुले व कुमार वाकळे यांच्यात जाेरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे पुढचा सभापती कोण याची राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू आहे.
महापालिका स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले आहेत. स्थायीच्या रिक्त झालेल्या आठ जागांवर सदस्य नियुक्तीसाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होत आहे. राजकीय पक्षांचे महापालिकेतील गटनेते बंद पाकिटात महापौरांकडे नाव सूचवितात. गटनेत्यांनी सूचविलेल्या नगरसेवकांची महापौर समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करतात. तशी घोषणा महापौरांकडून सभागृहात केली जाते. हे आठ सदस्य नियुक्त केल्यानंतर आयुक्तांच्या परवानगीने सभापतींच्या निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला जाते. स्थायीचे सदस्य नियुक्तमुळे सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, सभापतिपदासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीकडून कुमार वाकळे व अविनाश घुले हे इच्छुक आहेत.
स्थायी समिती सेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी पाच सदस्य आहेत. भाजपचे चार सदस्य असून, काँग्रेस व बसपाचे प्रत्येक एक, असे संख्याबळ आहे. सेना व राष्ट्रवादीचे संख्याबळ समान असल्याने सेनेकडूनही सभापती पदावर दावा केला जाऊ शकतो. सेनेत दोन गट आहेत. सेनेचे तीन सदस्य निवृत्त झालेले आहेत. त्या जागी नवीन तीन सदस्यांची नियुक्ती केली जाईल. सेनेकडून कुणची वर्णी लागते, त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
.....
भाजपकडून ताठे, बारस्कर
भाजपचे दोन सदस्य निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी नगरसेवक रवींद्र बारस्कर व वंदना ताठे यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. भाजपाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत बारस्कर व ताठे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्याते आले.
....