कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:15 AM2021-05-03T04:15:52+5:302021-05-03T04:15:52+5:30
केडगाव : कोरोना संकटकाळामध्ये आम्ही जनतेबरोबर असून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करत आहोत. कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी शासकीय नियमांचे ...
केडगाव : कोरोना संकटकाळामध्ये आम्ही जनतेबरोबर असून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करत आहोत. कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी केले.
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या वतीने नगर तालुक्यातील विविध कोविड सेंटरमधील रुग्णांना १० हजार अंड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मोहन गहिले, ज्ञानदेव शेळके, पोपट पुंड, अमोल सुरसे, प्रशांत गहिले, अमोल घाडगे, मोहन जाधव, डॉ. ससाणे, नंदू गहिले आदी उपस्थित होते.
मोहन गहिले म्हणाले, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या वतीने अरणगाव कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांना फूड प्रोटीन मिळावे, या हेतूने प्रत्येक रुग्णांना पाच दिवस पुरतील, असे अंडे दिले आहेत. नगर तालुक्यावर जेव्हा-जेव्हा संकट येते, तेव्हा-तेव्हा कर्डिले धावून येत असतात. जनतेबरोबर राहून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम ते करीत असतात.
----
०२ कर्डिले अंडे
नगर तालुक्यातील कोविड सेंटरमधील रुग्णांना अंडीवाटप करताना अक्षय कर्डिले.