शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:19 AM2021-04-11T04:19:59+5:302021-04-11T04:19:59+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील शेळकेवाडी येथील सुशीलकुमार शेळके आणि शिवाजी शेळके यांच्या जिरेनियम शेतीला औटी यांनी भेट दिली. त्यावेळी ...
श्रीगोंदा तालुक्यातील शेळकेवाडी येथील सुशीलकुमार शेळके आणि शिवाजी शेळके यांच्या जिरेनियम शेतीला औटी यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
विजय औटी म्हणाले, पारंपरिक शेतीला फाटा देत तरुण शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवताना दिसत आहेत. असाच एक नवा प्रयोग शेळके यांनी जिरेनियम शेतीच्या माध्यमातून केला आहे. कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी घरात रहावे. शेतामध्ये काम करावे. सरकारच्या नियमांचे पालन करून या कोरोना लढाईमध्ये सरकारला साथ द्यावी.
तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के म्हणाले, या शेतीस एकरी खर्च सत्तर हजार रुपये येतो. जिरेनियमचे एकरी उत्पन्न चार लाखांपर्यंत जाते. एकदा लागवड केल्यानंतर हे पीक तीन वर्षे चालते. यासाठी डिस्टिलेशन युनिटची गरज आहे. या युनिटची किंमत दीड लाखांपासून सुरू होते. कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे हे पीक आहे.
यावेळी शिवसेना पारनेर तालुका उपाध्यक्ष रामदास भोसले, श्रीगोंदा भाजपा युवा अध्यक्ष शांताराम वाबळे, अरुण शेळके, मारुती शेळके, वीज कर्मचारी अक्षय मापारी उपस्थित होते.
१० औटी