शेतीतील उर्जास्त्रोतांचे पुनरुज्जीवन गरजेचे- अशोक दलवाई; कृषी विद्यापीठात किसान आधार संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 04:30 PM2019-10-26T16:30:40+5:302019-10-26T16:31:42+5:30

भारत हा कृषिप्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीशिवाय सार्वत्रिक विकास शक्य नाही.  उद्याच्या भविष्यासाठी शेतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. शेतीमधील नैसर्गिक उर्जास्त्रोताचे पुनरुजीवन करुन शेती भविष्यात हजारो वर्ष चांगल्या स्थितीत राहू शकेल. पयार्याने मानवाचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले.

Need for revitalization of farm energy sources - Ashok Dalwai; Kisan Aadhar Sammelan at Agricultural University | शेतीतील उर्जास्त्रोतांचे पुनरुज्जीवन गरजेचे- अशोक दलवाई; कृषी विद्यापीठात किसान आधार संमेलन 

शेतीतील उर्जास्त्रोतांचे पुनरुज्जीवन गरजेचे- अशोक दलवाई; कृषी विद्यापीठात किसान आधार संमेलन 

राहुरी  :  भारत हा कृषिप्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीशिवाय सार्वत्रिक विकास शक्य नाही.  उद्याच्या भविष्यासाठी शेतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. शेतीमधील नैसर्गिक उर्जास्त्रोताचे पुनरुजीवन करुन शेती भविष्यात हजारो वर्ष चांगल्या स्थितीत राहू शकेल. पयार्याने मानवाचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले.
 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आणि आत्मा, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित किसान आधार संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी दलवाई बोलत होते. 
 डॉ. अशोक दलवाई यांच्या हस्ते शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा होते. प्रास्ताविक आणि स्वागत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. शदर गडाख यांनी केले. दलवाई पुढे म्हणाले, आज संपूर्ण जगाला जागतिक तापमानवाढीची समस्या भेडसावत आहे. माती व जमिनीतील पाण्याची प्रत खराब झाल्यामुळे आजची शेती धोक्यात आली आहे. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेतीतील जैविक घटकांचे अवशेष पुन्हा मातीत मिसळवणे गरजेचे आहे. निसर्गाने मोफत दिलेल्या उर्जास्त्रोतांचा जास्तीत जास्त वापर करुन उर्जेची गरज भागवली पाहिजे. गेल्या चार वर्षात केंद्र सरकार शेती क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करुन कृषी विस्ताराचे धोरण आखत आहे. पीक उत्पादन घेताना उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे. 
शिवाजीराव जगताप यांनी कृषी विभागाचा आढावा सादर केला. डॉ. रावश्यान इस्मायलो यांनी आपले मनोगत रशियन भाषेत व्यक्त केले. अनुवाद डॉ.रविप्रकाश दाणी यांनी केला. कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, डॉ. प्रतापराव भोसले यांनी मार्गदर्शन केले. 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगरु डॉ. रविप्रकाश दाणी, उझबेकिस्तान येथील नमणगन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेचे डॉ. रावश्यान इस्मायलो, कामधेनु विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य प्रतापराव भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, डॉ. अशोक फरांदे,  सोपान कासार,  विजय कोते, विद्यापीठ अभियंता  मिलिंद ढोके, सुनीता पाटील, नाथाजी चौगुले उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.भगवान देशमुख यांनी केले. आभार डॉ. अशोक फरांदे यांनी मानले.
 

Web Title: Need for revitalization of farm energy sources - Ashok Dalwai; Kisan Aadhar Sammelan at Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.