ग्रामपातळीवर सामाजिक सौहार्दाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:39+5:302021-01-08T05:03:39+5:30
तळेगाव दिघे : गावातील छोटे-मोठे तंटे गावापातळीवरच मिटले पाहिजे. सामाजिक व जातीय सलोखा अबाधित राहावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित ...
तळेगाव दिघे : गावातील छोटे-मोठे तंटे गावापातळीवरच मिटले पाहिजे. सामाजिक व जातीय सलोखा अबाधित राहावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामपातळीवर सामाजिक सौहार्द गरजेचा आहे, असे प्रतिपादन संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातर्फे रेझिंग डेच्या निमित्ताने तळेगाव दिघे येथे कोरोना पार्श्वभूमीवर जनजागृती व प्रबोधन कार्यक्रमात पवार बोलत होते.
याप्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम दिघे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मधुकर दिघे, सचिन दिघे, प्राचार्य एच. आर. दिघे, संजय दिघे, गणेश दिघे, सोपान दिघे, लक्ष्मण औटी, दत्ता मेंगाळ, बाबा खेडकर, विठ्ठल दिघे, बी. सी. दिघे, मतीन शेख, भाऊसाहेब दिघे, अशोक जगताप, रावसाहेब जगताप, देवीदास कांदळकर, नजीर शेख, लक्ष्मण दिघे, राजू जगताप, असिफ शेख, मंदाकिनी जगताप, गणेश बोखारे उपस्थित होते.