गरजूंना माणुसकीच्या नात्याने मदत केली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:51+5:302021-03-22T04:19:51+5:30

जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्या वतीने ७० गरजू कुटुंबांना महिनाभराचा किराणा देण्यात आला. स्व. विजयाबाई रमेशलाल चोपडा (साकूरवाला) यांच्या ...

The needy should be helped as human beings | गरजूंना माणुसकीच्या नात्याने मदत केली पाहिजे

गरजूंना माणुसकीच्या नात्याने मदत केली पाहिजे

जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्या वतीने ७० गरजू कुटुंबांना महिनाभराचा किराणा देण्यात आला. स्व. विजयाबाई रमेशलाल चोपडा (साकूरवाला) यांच्या स्मरणार्थ सचिन चोपडा यांनी ही मदत केली. जय आनंद मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष नंदलाल कोठारी‌ यांच्या शोभानंद निवासस्थानी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा, सेक्रेटरी विजय गुगळे, नंदलाल कोठारी, किशोर पितळे, मूळचंद डागा, रितेश कोठारी, सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे अध्यक्ष ईश्वर बोरा, नूतन गांधी, संतोष कर्नावट, सेक्रेटरी आदी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी सौरभ बोरा, प्रमिला बोरा, चंपालाल मुथा, अशोक (बाबुशेठ) बोरा, राजेंद्र चोपडा, सुनील मुनोत, पनालाल बोगावत, अजय बोरा, अभय श्रीश्रीमाळ, सतीष मुथा, किशोर गुगळे आदींचे सहकार्य लाभले. विजय गुगळे यांनी स्वागत केले. शेवटी रितेश कोठारी यांनी आभार मानले.

Web Title: The needy should be helped as human beings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.