नेवासा पोलिसांवर जुगा-यांची दगडफेक : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 04:19 PM2018-08-07T16:19:13+5:302018-08-07T16:20:09+5:30
तालुक्यातील रामडोह येथे सोमवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या नेवासा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचा-यांना जुगा-यांनी धक्काबुक्की करत पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्यो दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात बाळकृष्ण शिवाजी गढेकर, किशोर सुदाम काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल वासिम मुस्तफा इनामदार यांनी फिर्याद दाखल केली आहे.
नेवासा : तालुक्यातील रामडोह येथे सोमवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या नेवासा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचा-यांना जुगा-यांनी धक्काबुक्की करत पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्यो दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात बाळकृष्ण शिवाजी गढेकर, किशोर सुदाम काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल वासिम मुस्तफा इनामदार यांनी फिर्याद दाखल केली आहे.
सोमवारी रात्री खब-या मार्फत मिळालेल्या माहितीवरुन रामडोह येथे एका ठिकाणी सुरु असलेला जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले असता पोलिसांना पाहून काही जुगा-यांनी तेथून पळ काढला. तर जुगार अड्डा चालविणा-या गढेकर व काळे यांनी पोलीस कर्मचा-यांसोबत हुज्जत घातली. जुगा-यांनी धक्काबुक्की करत त्यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये दोन्ही कर्मचारी या झटापटीत जखमी झाले असून त्याचवेळी पोलीस नाईक प्रीतम मोढवे तेथे गेल्याने गढेकर व काळे यांनी तेथून पळ काढला. पोलिस कॉन्स्टेबल वासिम इनामदार यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात बाळकृष्ण शिवाजी गढेकर, किशोर सुदाम काळे (दोघेही राहणार - रामडोह, ता. नेवासा) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.