आठ कोरोनाबाधितांचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 04:47 PM2020-04-19T16:47:35+5:302020-04-19T16:48:05+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील आठ कोरोनाबाधित रुग्णांचा १४ दिवसांनंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्हत बारा रुग्ण घरी होऊन परतले आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्या संगमनेर शहरातील तीन, संगमनेर तालुक्यातील एक, जामखेड तालुक्यातील चार अशा कोरोनाबिधात असलेल्या आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

या आठ जणांवर नगर शहरातील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या रुग्णांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांना आता हॉस्पिटलमधून सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या आठ रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणासाठी दाखल केले जाणार आहे. नगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा २९ आहे. नगर शहरात आणि जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळत नसल्याने ते दिलासादायक ठरत आहे.
आठ रुग्णांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना संगमनेर आणि जामखेड येथे संस्थात्मक अलगीकरणासाठी बुथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.