रखडलेल्या महामार्गाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:23 AM2019-02-02T11:23:19+5:302019-02-02T11:24:29+5:30

हरिहर गर्जे पाथर्डी : कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गांतर्गत पाथर्डी तालुक्यातील १३० कोटी रूपये खर्चाच्या या महामार्गाचे काम गेल्या तीन ...

Neglect of people's representatives on the highway left | रखडलेल्या महामार्गाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

रखडलेल्या महामार्गाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

हरिहर गर्जे
पाथर्डी : कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गांतर्गत पाथर्डी तालुक्यातील १३० कोटी रूपये खर्चाच्या या महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने तसेच खड्डे पडल्याने प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या नुतनीकरणासाठी १३० कोटी रूपये आर्थिक तरतूद करण्यात येऊन गेल्या तीन वर्षांपासून नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु २०१६ पासून अर्धवटच काम असल्याने या महामार्गाने प्रवास करणाºया शेकडो निष्पाप प्रवाशांचे अपघात होत आहेत. याबाबत स्थानिक राजकीय पदाधिकारी,विरोधक यांनी तेवढ्यापुरती आंदोलने केली. पण पुढे आंदोलनाचा हा जोर चमत्कारिकरित्या ओसरताना दिसत आहे. परंतु
सत्ताधारी पुढाºयांनी याप्रश्नाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.
याबाबत आवाज उठविण्यात अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींविरूद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे.
परिस्थितीचा गैरफायदा घेत स्थानिक गुंडांनी ठेकेदाराची अडवणूक करून महामार्गाच्या बांधकाम साहित्य व मोठ्या प्रमाणावर गौण खनिजांची चोरी करीत लाखो रूपये कमविले आहेत. असे प्रकार राजरोस घडत असल्याने या कामाचा ठेकेदार तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहे. दिवसेंदिवस तोटा सहन करावा लागत असल्याने या कामाच्या उपठेकेदारांमध्ये आपसात देवघेवीवरून वाद निर्माण झाले आहेत.

ठेकेदाराने निविदेत नसलेली नियमबाह्य कामे केल्याने या कामाची बिले रखडली आहेत. आंदोलनांना वैतागलेल्या महामार्ग अधिकाºयांनी आपल्या बदल्या दुसरीकडे करून घेतल्या आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे.

मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. जी.डी.सी.एल कंपनीकडे साडे सहा कोटी रूपये व अतिरिक्त कामाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २० कोटी रूपयांची बिले अडकली आहेत. मुख्य ठेकेदार व आमच्यातील बँक खाते स्वतंत्र करून थकीत बिले मिळाल्यास लवकरच सर्व कामे पूर्ण करू - रवींद्र कासार, ठेकेदार.

दोन ठेकेदारांमधील वादामुळे महामार्गाचे काम रखडले आहे. त्याबाबत वरिष्ठ स्तरावरून कार्यवाही सुरू आहे. - बी.बी.नन्नवरे, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग.

 

Web Title: Neglect of people's representatives on the highway left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.