अहमदनगरमध्ये सारसनगरच्या रुग्णाचे नेप्तीबाजार कनेक्शन चर्चेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 11:41 AM2020-05-14T11:41:39+5:302020-05-14T11:43:42+5:30

अहमदनगर : शहरातील सारसनगर आणि नेप्तीबाजार समिती हे नाते सर्वश्रुत आहे़ कोरोनाच्या महामारीत ही दोन्ही ठिकाणे पुन्हा चर्चेत आली आहेत. सारसनगरमधील रुग्णाची नेप्तीबाजारमध्ये नेहमीच ये-जा असायची़ रुग्णाच्या या कनेक्शनमुळे नेप्तीबाजारातही भितीचे वातावरण आहे़.

Neptibazar connection of Sarasnagar patient in Ahmednagar under discussion | अहमदनगरमध्ये सारसनगरच्या रुग्णाचे नेप्तीबाजार कनेक्शन चर्चेत 

अहमदनगरमध्ये सारसनगरच्या रुग्णाचे नेप्तीबाजार कनेक्शन चर्चेत 

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरातील सारसनगर आणि नेप्तीबाजार समिती हे नाते सर्वश्रुत आहे़ कोरोनाच्या महामारीत ही दोन्ही ठिकाणे पुन्हा चर्चेत आली आहेत. सारसनगरमधील रुग्णाची नेप्तीबाजारमध्ये नेहमीच ये-जा असायची़ रुग्णाच्या या कनेक्शनमुळे नेप्तीबाजारातही भितीचे वातावरण आहे़.
शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे निवासस्थान असलेल्या सारसनगर परिसरातील शांतीनगर भागात बुधवारी एक रुग्ण आढळला़ ही व्यक्ती नेप्तीबाजार समितीतून भाजीपाला आणून विकत होती़ भाजी खरेदीच्यानिमित्ताने ही व्यक्ती दररोज नेप्तीबाजार समितीत येत होती़ ही व्यक्ती पॉझिटीव्ह असल्याची माहिती वाºयासारखी पसरली आहे़ नेप्तीाबाजारातही ही माहिती पोहोचली आहे़ त्यामुळे तिथे काम करणाºया कामगारांनाही भिती असून, रुग्णाचे नेप्ती कनेक्शन यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे़
राजकीय असो की सामाजिक असो, सारसनगर आणि नेप्ती बाजार हे पूर्वीपासूनच कनेक्शन पक्के आहे. कोरोनामध्येही हे कनेक्शन कायम राहिले आहे. या महिलेने कोणा-कोणाकडून भाजी खरेदी केली, ज्यांच्याकडून भाजी खरेदी केली, ते लोक नेप्ती बाजार समितीमध्ये कोणाकोणाला भेटले, याचीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे नेप्ती बाजार समितीमध्ये कोरोनाबाबत भीती पसरली आहे. या कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नेप्ती बाजार समितीमध्ये भाजीपाला-फळ खरेदी-विक्री करणाºयांनी भितीसोबतच सर्तकताही बाळगली असल्याचे गुरुवारी दिसून आले.

Web Title: Neptibazar connection of Sarasnagar patient in Ahmednagar under discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.