मराठा आरक्षणासाठी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 05:26 PM2018-07-31T17:26:43+5:302018-07-31T17:27:18+5:30
अस्तित्वात असलेल्या इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी सभापती व सदस्य पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
नेवासा : अस्तित्वात असलेल्या इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी सभापती व सदस्य पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
सुनीता गडाख म्हणाल्या, मराठा समाजाचे सुमारे ५७ मोर्चे शांततेत झाले आहे. परंतु राज्य सरकार तांत्रिक सबबी पुढे करून वेळकाढुपणा करण्यात आला. कुठल्याही राज्यकर्त्यांनी यात लक्ष घातले नाही. शेवटी याचा दुर्देवी परिणाम हे आंदोलन पुन्हा पेटले आहे. त्यात हिंसाचार घडवून त्या शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या सर्वांची परिणीती मराठा समाजातील अनेक बांधवांनी आत्महत्या होत आहेत. या दुर्दैवी कुटुंबावर झालेल्या आघाताला शब्द अपुरे आहेत. या कारणांनी मी गेले काही दिवस अस्वस्थ होते. या विषयावर आपले नेते व मार्गदर्शक माजी आमदार शंकरराव गडाख यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला जनतेपेक्षा कोणतेही पद मोठे नाही, प्रसंगी त्यासाठी कोणतेही पद सोडून समाजाबरोबर उभे राहिले पाहिजे, असा सल्ला दिला. त्यांच्या या भूमिकेनुसार मी आज माझ्या पंचायत समिती सभापती व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यापुढेही मी पूर्ण ताकतिनिशी सर्व समाज बांधवांच्या रास्त मागण्यासाठी त्यांच्याबरोबर लढाईत सामील होणार आहे, असे सुनीता गडाख यांनी म्हटले आहे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपल्या पदाचा राजीनामा देणा-या सुनिता शंकरराव गडाख या महाराष्ट्रातील पहिल्या पंचायत राज पदाधिकारी आहेत.