नेवासा फाटा परिसरात कापसाच्या व्यापा-याला कारसह १३ लाखाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 04:19 PM2017-12-12T16:19:50+5:302017-12-12T16:20:57+5:30

पोलीस असल्याचे भासवून राहुरी तालुक्यातील कापूस व्यापा-याचा वाहनासह १३ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना नेवासा फाटा परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

In the Nevasa Phata area, the looted car was looted 13 lakhs with a car | नेवासा फाटा परिसरात कापसाच्या व्यापा-याला कारसह १३ लाखाला लुटले

नेवासा फाटा परिसरात कापसाच्या व्यापा-याला कारसह १३ लाखाला लुटले

नेवासा : पोलीस असल्याचे भासवून राहुरी तालुक्यातील कापूस व्यापा-याचा वाहनासह १३ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना नेवासा फाटा परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत नेवासा पोलिसांत व्यापारी युनूस बुगण शेख (रा.वळण, राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १० डिसेंबर रोजी नेवासा भागातील कापूस व्यापा-यांना देण्यासाठी माझी गाडी मारुती व्हिटारा ब्रिझा क्रमांक एम.एच. १७, बी.व्ही.-१३५२ यामध्ये ५ लाख रुपये घेऊन आलो होतो. नेवासा खुर्द भागातील व्यापारी विजय राशीनकर यांच्याकडे माझी कापसाची गाडी भरत होती, मात्र कापूस कमी पडल्याने उस्थळ दुमाला येथील दुसरे व्यापारी रामेश्वर दिगंबर सिदलंबे यांच्याकडे जाऊन कापसाची बोलणी करून कापसापोटी त्यांना १ लाख रुपये दिले. नेवासा फाटा येथून नेवासाकडे येण्यासाठी निघालो असता रस्त्याच्या कडेला खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट व जर्किंन तसेच डोक्यात हेल्मेट घालून मोटारसायकलवर बसलेल्या एक इसमाने गाडीला हात करून बाजूला लावण्याचा इशारा करून थांबण्यास सांगितले. त्यांच्या अंगातील कपड्यावरून वाहतूक पोलीस असल्याचे वाटल्याने गाडीचा वेग कमी केला. मात्र त्याच्या जवळ जात असताना हा पोलीस नसावा असा अंदाज आल्याने गाडीचा वेग पुन्हा वाढविला. त्यानंतर सदर इसमाने मोटारसायकल क्रमांक एम.एच. १९, ए.एस.-१५५३ यावरून पाठलाग करून गाडी बाजूला लावायला सांगितले. गाडी चालवताना फोनवर बोलतो, असे म्हणत माझ्याकडे लायसन्स व कागदपत्राची मागणी केली. माझ्याकडे कागदपत्र असल्याचे सांगितले. परंतु लायसेन्स नाही असे सांगताच गाडी पोलीस ठाण्यात न्यावी लागेल, असे सांगत हेल्मेट काढून खिशातील पोलीस टोपी माझ्या गाडीत टाकून स्वत: ड्रायव्हर सीटवर बसून मला मोटारसायकल मागे घे व तू पलीकडून येऊन गाडीत बस असे सांगितले. मी मागे गेलो असता तो गाडी घेऊन भरधाव वेगाने नेवाशाच्या दिशेने निघून गेला. गाडीची किंमत ९ लाख तसेच ४ लाख रुपये रोख अशी एकूण १३ लाख रुपयांची लूट झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे हे करीत आहेत.

Web Title: In the Nevasa Phata area, the looted car was looted 13 lakhs with a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.