नेवासेत वाळू तस्करांच्या खब-यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:56 PM2018-05-24T17:56:31+5:302018-05-24T18:07:23+5:30
वाळू तस्करांना खबर देणा-या चार खब-यांवर नेवासा तहसीलदार उमेश पाटील यांनी कारवाई केली. संदीप सुरेश जाधव, समीर इसाक इनामदार, विलास मच्छिंद्र पवार, राजेंद्र शंकर धनवटे या चार खब-यांना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावली.
नेवासा : वाळू तस्करांना खबर देणा-या चार खब-यांवर नेवासा तहसीलदार उमेश पाटील यांनी कारवाई केली. संदीप सुरेश जाधव, समीर इसाक इनामदार, विलास मच्छिंद्र पवार, राजेंद्र शंकर धनवटे या चार खब-यांना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावली.
नेवासा तालुक्यातील वाळूला बांधकाम क्षेत्रामध्ये या वाळूला मोठी मागणी आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यात वाळू तस्करांच्या अनेक टोळ्या आहेत. विविध भागांमध्ये अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती तहसीलदारांना वेळोवेळी मिळत. त्यावर त्वरित कारवाई देखील केली जाते. मात्र तहसील पथकाला माहिती वाळू तस्करांनी माहित घेण्यासाठी खबरे ठेवले जात आहेत. हे खबरे तहसील कार्यालय तसेच गणपती चौक, बसस्थानक चौक, मधमेश्वर नगर ,आणि तहसीलदार यांच्या निवासस्थान परिसरात दररोज रात्रंदिवस तहसिलदारांवर लक्ष ठेवण्यासाठी असतात. मंगळवारी रात्री तहसीलदार तसेच त्यांचे पथक कारवाई करण्यासाठी बाहेर निघाले असता काही वाळू तस्करांचे खबरे तहसीलदार निवासाबाहेर तहसीलदारांवर लक्ष्य ठरून असल्याचे नेवाशाचे तहसीलदार उमेश पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ नेवासा पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांना फोन करून याची माहिती कळवली. पोलिसांनी तसेच तहसिलदार पाटील यांनी संदीप सुरेश जाधव, समीर इसाक इनामदार, विलास मच्छिंद्र पवार, राजेंद्र शंकर धनवटे या चार जणांविरुद्ध भा.द.वि.कलम १०७ व भा.द.वि.कलम ११७ प्रमाणे गुन्हा दाखल करून भा. द. वि.कलम १२२ प्रमाणे अटक केली.
‘‘वाळू तस्करीवर आळा घालणे खब-यांमुळे शक्य होत नाही. कारवाई वेळोवेळी चालूच असते परंतु अपयश येत असे. चार जणांवर प्रोसिडिंग करून न्यायालयीन कोठडीत त्यांना ठेवण्यात आले. यामुळे कायदा व सुव्यवस्था देखील या कारवाईने रोखण्यास मदत होणार आहे. खबर देणारे हे नेहमीच चौकाचौकात टोळक्याने उभे राहून खबर देत असतात. त्यातील अनेक जण नशेत असतात. पथकांना धमकावणे, पाठलाग करणे, महसूल कर्मचा-यांना दमदाटी करणे, हाणामारी करणे अशी दादागिरी चालू असते. नागरिक ही त्यांच्याविरुद्ध तक्रारही करत नाहीत. या कारवाईमुळे वाळू तस्करीला आळा बसेल. यापुढे ही अशी कारवाई सुरूच राहील.’’ - उमेश पाटील, तहसीलदार