जिल्ह्यातील १३३ गावात नवीन रास्तभाव दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:30 PM2018-05-09T21:30:51+5:302018-05-09T21:31:11+5:30
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वत धान्याचा लाभ मिळण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १३३ गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकाने सुरु करण्यात येणार आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वत धान्याचा लाभ मिळण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १३३ गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकाने सुरु करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत असून लवकरच दुकाने सुरु होणार आहेत. पारनेर व अकोेले तालुक्यात सवार्धिक २३ तर अहमदनगर शहरात सर्वात कमी २ दुकाने सुरु करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात नवीन रास्तभाव दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. शहरामध्ये बुरुडगल्ली, ब्राम्हणगल्ली (भिंगार), नगर तालुक्यातील सांडवे, कोळपे आखाडा, उदरमल, वाळकी, पारगाव मौला या गावामध्ये नवीन दुकाने सुरु केली जाणार आहेत. शेवगाव तालुक्यात निंबे, नांदूरविहीरे, आखेगाव तितर्फा, ठाकूर निमगाव, शहरटाकळी तर श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू, येळपणे, एरंडोली, श्रीगोंदा, वेळू, कौठा, आनंदवाडी या गावांचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील कापरेवाडी, गुरवप्रिपी, जामखेड तालुक्यातील गुरेवाडी, आपटी, पारनेर तालुक्यातील गाडीलगाव, सुलतानपूर, पळवे बु. मुंगशी, वाघुंडे खु., यादववाडी, बहिरोबावाडी, पिंपळगाव तुर्क, वेसदरे, गारगुंडी, भोंद्रे, कारेगाव, डोंगरवाडी, मोरवाडी, शेरी कासारे, रेनवडी, गारखिंडी, पाडळी दर्या, जाधववाडी, वडुले, घाणेगाव, हकीकतपूर, कासारे या २३ गावांचा समावेश आहे. नेवासा तालुक्यात उस्थळ खालसा, बोरगाव, माळेवाडी, वंजारवाडी, खेडले परमानंद, झापवाडी, सांगवी, माळेवाडी दु. जळके खु. गोयगव्हाण, शिंगवे तुकाई, गोपाळपूर, फत्तेपूर, संगमनेर तालुक्यातील काकडवाडी, अमृतनगर, बांबळेवाडी, कणसेवाडी, चिंचेवाडी, वडगाव पान, पारेगाव खु. वडझरे बु., राहुरी तालुक्यातील गुंजाळे, धामोरी बु., खंडाबे बु., डिग्रस (म.फुले कृषी विद्यापीठ), राहुरी बु., गडदे आखाडा, चिंचाळे, जांभूळबन, पिंप्री वळण, धानोरे, जातप, माळेवाडी या गावांचा समावेश आहे. श्रीरामपूर तालुक्यात श्रीरामपूर शहरात ८, कडीत खु., एैनतपूर, हरेगाव, कोपरगाव तालुक्यातील शहापूर, धोंडेवाडी, बहादराबाद, सोयगाव, ब्राम्हणगांव, सोनारी, डाऊच बु., कोपरगाव शहरात एक दुकान नवन सुरुवात होणार आहेत.
अकोले तालुक्यातील रणद बु., मनोहरपूर, डोंगरवाडी, पेंडशेत, कोंदणी, मुरशेत, सावरकुटे, चितळवेढे, भंडारदरा, माळेगाव, जायनावाडी, ढोकरी, पुरुषवाडी, साकीरवाडी, पाभुळवाडी, चैतन्यपूर, तिरडे, आंबेवंगण, टिटवी, शेणित खु., मान्हेरे, मोरवाडी, फोफसंडी या गावांचा समावेश आहे. राहाता तालुक्यात पिंपळस, अस्तगाव, शिर्डीमध्ये ३ दुकांनाचा समावेश आहे. पाथर्डी तालुक्यात किर्तनवाडी, पारेवाडी, बैजुबाभुळगाव, सामठाणे खु. ढाकणवाडी, सामठाणे नलावडे, सांगवी बु., या गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकाने सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी पुरवठा विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
त्याच गावातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना अर्ज करता येणार आहेत. जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे अर्ज करता येणार आहे.
तालुकानिहाय गावांची संख्या
अहमदनगर शहर २
नगर तालुका -५
शेवगाव ५,
श्रीगोंदा ७
कर्जत २,
जामखेड २,
पारनेर २३
नेवासा १३,
संगमनेर ८,
राहुरी१२
श्रीरामपूर ११
कोपरगाव ८
अकोले २३,
राहाता ५
पाथर्डी ७