नवीन शैक्षणिक धोरणात कर्मवीरांच्या विचाराचे प्रतिबिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:36+5:302021-09-23T04:23:36+5:30
येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आयोजित १३४ व्या कर्मवीर जयंती सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयात ...
येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आयोजित १३४ व्या कर्मवीर जयंती सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयात हा समारंभ ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील होते. डॉ. विद्यासागर म्हणाले की, अण्णांनी विद्यार्थ्यांचे हित व गुण पारखून त्यांच्या क्षमता वाढविण्यासाठी सतत प्रयत्न केला. रयत आजही सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम करीत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीरांबद्दल आदरभाव व्यक्त करून शुभेच्छा संदेश देऊन कार्यक्रमाचे उदघाटन केले. कर्मवीरांचा जन्मदिन हा श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील सर्व सेवकांनी श्रमदान केले.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. नासिर सय्यद, मंजूश्री भागवत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपप्राचार्य प्रा. रामदास बर्वे यांनी आभार मानले. प्रा. सतीश शिर्के व प्रा. शुभांगी ठुबे यांनी सूत्रसंचालन केले. तांत्रिक साहाय्य शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विलास एलके व प्रा. अजय जाधव यांचे लाभले.
------------
फोटो -२२काळे काॅलेज
राधाबाई काळे महिला महाविद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला.