सत्तांतर होताच मनपात नवे चेहरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:32+5:302021-07-07T04:26:32+5:30
अहमदनगर : महापालिकेत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते ठेकेदारांची असलेली वर्दळ अचानक कमी झाली असून, सोमवारी महापालिकेत अनेक नवे चेहरे पाहायला ...
अहमदनगर : महापालिकेत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते ठेकेदारांची असलेली वर्दळ अचानक कमी झाली असून, सोमवारी महापालिकेत अनेक नवे चेहरे पाहायला मिळाले. यावरून महापालिकेत ‘नवा गडी, नवे राज’ सुरू झाल्याचे प्रकर्षाने जाणवले.
गतवेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली. महापौर व उपमहापौर ही दोन्ही प्रमुख पदे भाजपकडे होती. त्यामुळे महपौर, उपमहापौर, सभागृहनेता दालनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ऊठबस असायची. महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपला. आगदी शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते महापालिकेत तळ ठोकून होते. नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजपचे पदाधिकारी गायब झाल्यासारखी परिस्थिती आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्याने त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ठेकेदार सोमवारी पालिकेत दाखल झाले. पदाधिकारी व अधिकाऱ्यांची भेट घेऊन रखडलेल्या कामांबाबत ते चर्चा करताना दिसले. सत्तांतर झाल्याने हा बदल झाला आहे, असे एका पदाधिकाऱ्याने खासगीत बोलताना सांगितले.
...
ठेकेदारही बदलणार
पदाधिकारी नगरसेवकांचे कार्यकर्ते असलेले अनेक जण पालिकेची कामे करतात. कुठली ठेकेदार संस्था कुणाशी संबंधित आहे, यावरही पालिकेत चर्चा झडत असते. महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असल्याने पूर्वीच्या ठेकेदारांना सोडचिट्टी मिळणार असून, सत्तांतरामुळे आता ठेकेदारही बदलतील, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.