फळे पिकविण्यासाठी नव्या तंत्राचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:20 AM2021-05-23T04:20:06+5:302021-05-23T04:20:06+5:30
हेंद्रे म्हणाले, कोणत्याही अत्याधुनिक उपकरणाशिवाय या पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो. याचा वापर व्यावसायिक तत्त्वावर छोटे शेतकरी उत्पादक, व्यापारी ...
हेंद्रे म्हणाले, कोणत्याही अत्याधुनिक उपकरणाशिवाय या पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो. याचा वापर व्यावसायिक तत्त्वावर छोटे शेतकरी उत्पादक, व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांद्वारे किफायतशीरपणे केला जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कमी खर्चाच्या रायपनिंग चैंबर्सचा बंदी घातलेल्या कॅल्शियम कार्बाइड पद्धतीला किंवा इतर क्लिष्ट अशा पुरीकरण प्रक्रियेला अथवा अत्याधुनिक रायपनिंग चैंबरमध्ये पिकवण प्रक्रियेला पर्याय म्हणून केला जाऊ शकतो. ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे. ज्यात इथिलिन गॅस सोडण्यासाठी अल्प प्रमाणात सोडियम हायड्रोऑक्साइड क्षार द्रवरूपी इथेलमध्ये मिसळला जातो आणि फळांना हवाबंद असलेल्या पोर्टेबल प्लॅस्टिक तंबू किंवा हवाबंद खोल्यांमध्ये या मुक्त इथिलिन वायूचा वापर विविध फळांच्या पिकवणीसाठी केला जातो. वायुरूपी इथिलिनचा संपर्क फळांशी होऊन पिकवण प्रक्रिया पूर्ण केली जाते व त्यामुळे कोणत्याही स्वरुपाचा रसायनांचे शोषण फळांमध्ये होत नसल्यामुळे ही सर्वात सुरक्षित पद्धत आहे.