चारचाकी वाहनांकरिता नवीन वाहन मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:19 AM2021-02-07T04:19:55+5:302021-02-07T04:19:55+5:30

----------------------- मधपाळ व मध केंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन अहमदनगर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधपाळ व ...

New vehicle series for four wheelers | चारचाकी वाहनांकरिता नवीन वाहन मालिका

चारचाकी वाहनांकरिता नवीन वाहन मालिका

-----------------------

मधपाळ व मध केंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधपाळ व मध केंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग यांनी केले आहे. या योजनेत मध उद्योगाचे विनामूल्य प्रशिक्षण व साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनासाठी सहाय्य देण्यात येते. योजनेत वैयक्तिक मधपाळ या घटकासाठी अर्जदार साक्षर व १८ वर्षे वयावरील असावा. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी असून जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवती, शेतकरी यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र,अहमदनगर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--------------

Web Title: New vehicle series for four wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.