नवीन वाहने, ई-टपालमुळे पोलीस यंत्रना गतीमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:26 AM2021-02-17T04:26:19+5:302021-02-17T04:26:19+5:30
येथील पोलीस मुख्यालय मैदानावर मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या वाहनांचा पोलीस दलात समावेश, श्री साई तीर्थक्षेत्र (पर्यटन) ...
येथील पोलीस मुख्यालय मैदानावर मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या वाहनांचा पोलीस दलात समावेश, श्री साई तीर्थक्षेत्र (पर्यटन) पोलीस मदत केंद्राचे ऑनलाईन उद्धाटन आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून पोलीस दलाच्या कामकाजासाठी मिळालेली ई-सामग्री प्रदान कार्यक्रम पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, इपीटोम कंपोनेन्ट्रस कंपनीचे अनुराग धूत, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, सौरभ अग्रवाल यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला २० वाहने मिळाली आहेत. राज्यात पहिल्यांदाच असा कार्यक्रम याठिकाणी होत आहे. जिल्हा नियोजन समितीचा वार्षिक आराखड्यासाठी जिल्ह्याला सन २०२०-२१ साठी ५१० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे पोलीस दल सक्षमीकरणासाठी त्यातून आवश्यक ती मदत करण्यात येईल.
यावेळी बोलताना आ. पवार म्हणाले, नगर जिल्हा आकाराने मोठा आहे. त्यात पोलीसांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मागणी आणि गरज असताना तुलनेने कमी संख्या दिसते. त्यात आता अशा ई-टपाल सुविधांचा वापर केल्यास वेळ आणि खर्चात बचत होण्याबरोबरच उपलबध मनुष्यबळाचा योग्य वापर करता येणार आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनीही, पोलीस दलाला जिल्हा नियोजन समितीतून वाहने उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले. जिल्हा पोलीस अधीक्ष पाटील यांनी प्रास्ताविक केले.अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आभार मानले.
आता चोर, दरोडेखोरांचा बंदोबस्त करा.
चाेर, दरोडेखोरांच्या गाड्या फास्ट झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडेही चांगली यंत्रना असने गरजेचे आहे.मिळालेली नवीन वाहने सर्व पोलीस स्टेशनला वितरित करून गुन्हेेगारांचा बंदोबस्त करा तसेच श्रद्धा, सबुरी, संरक्षण आणि विश्वास या प्रमाणे काम करा, असे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले.
फोटो १६ हसन मुश्रीफ
ओळी- जिल्हा नियोजन समिच्या माध्यमातून मिळालेली वाहने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते पोलीस दलास सुपूर्त करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, विशेष पोलीस महानिरक्षक प्रताप दिघावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी.