नवीन वर्षात मद्यधुंद झालेल्या पतीचा खून; पत्नीने रचला मृत्यूचा बनाव

By शिवाजी पवार | Published: January 3, 2024 01:30 PM2024-01-03T13:30:48+5:302024-01-03T13:32:15+5:30

डोक्यात रॉडचा घाव घातला 

new year drunk husband murder by wife | नवीन वर्षात मद्यधुंद झालेल्या पतीचा खून; पत्नीने रचला मृत्यूचा बनाव

नवीन वर्षात मद्यधुंद झालेल्या पतीचा खून; पत्नीने रचला मृत्यूचा बनाव

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर : नवीन वर्षाच्या स्वागताला मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन छळ करणाऱ्या पतीचा पत्नीने डोक्यात रॉडचा घाव घालून खून केला. मात्र पायरीवरून पाय घासरून मृत्यू झाल्याचा तिने बनाव रचला. पोलिस तपासात मात्र बनाव उघड झाल्याने पत्नीला अटक करण्यात आली आहे.

आरोपीचे नाव संगीता संजय भोसले (वय ३८ रा. अतिथी कॉलनी) असे आहे. तिचा पती संजय गवुजी भोसले (वय ४०) याचा १ जानेवारीला पहाटे पाच वाजता मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस पथकास भोसले यांच्या मृत्यू बाबत संशय आल्याने त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मयताच्या डोक्यास झालेल्या जखमाबाबत डॉक्टारांनकडून माहिती घेतली. पायरीवरुन पाय घसरुन पडून मृत्यू झालेल्या नसून तो शस्त्राने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

पोलिसांनी मयताचा अत्यंविधी झाल्यानंतर तात्काळ संगीता हिला ताब्यात घेऊन पोलिस ठण्यात आणले. तिच्याकडे तपास केला असता तिने सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तिला अधिक विश्वासात घेत सखोल तपास केला असता तिने खरा घटनाक्रम पोलिसांना सांगितला.

पती संजय हे दारु पिवुन नेहमी त्रास देत. माझ्यावर संशय घेतहोते. त्यामुळे आमच्यात नेहमी वाद होत होते. ३२ डिसेंबरला रात्री ते खूप दारु पिले होते. त्यांनी मुलासमोर शरीरसंबंधाची मागणी केली. त्याला नकार दिल्याने माझ्यावर संशय पती संजय यांनी शिवीगाळ केली. पहाटेपर्यंत त्यांनी शिवीगाळ केली. 

नेहमीच्या भांडणाला कंटाळून पती लघुशंके करीता बाहेरील वरंड्यात उभे राहिले असता त्यांना ढकलून दिले. ते खाली पडले तेव्हा त्यांच्या कामाच्या पिशवीमध्ये असलेला टॉमीसारख्या रॉडने रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात पाच सहा वार केले. त्यामध्ये त्याचे डोके फुटुन रक्तस्त्राव झाला व त्यातच मृत्यू झाला, अशी हकिगत संगीता भोसले यांनी सांगितली.

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन गुन्हयात आरोपी पत्नीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने संगीता भोसले हिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी गुन्ह्याचा तपास केला.

 

Read in English

Web Title: new year drunk husband murder by wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.