‘त्या’बंदिवानाकडे सापडली नक्षल्यांशी संबंधित बातमी अन् एक चिठ्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 05:27 PM2020-01-01T17:27:48+5:302020-01-01T17:27:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा कारागृहात महिला पोलीस कर्मचाºयावर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाºया बंदिवानाकडे नक्षलवाद्यांशी संबंधित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा कारागृहात महिला पोलीस कर्मचाºयावर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाºया बंदिवानाकडे नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या बातमीचे कात्रण व एक चिठ्ठी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ स्थानिक पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेत या बंदिवानाची पूर्ण माहिती काढून याबाबत नक्षलवाद विरोधी अभियानाकडे अहवाल पाठविला आहे़
पत्नीच्या नातेवाईकांवर खुनी हल्ला केल्याच्या गुन्ह्यात पावलस कचरू गायकवाड याला पारनेर पोलिसांनी अटक केली होती़ त्याला जामीन न मिळाल्याने गेल्या काही महिन्यांपासून गायकवाड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे़ गायकवाड याने २२ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला़ या प्रयत्नात त्याने कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलवर चाकूने हल्ला केला़ यावेळी गायकवाड याला प्रवेशद्वाराची चावी न मिळाल्याने त्याचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला़ ही घटना कारागृहातील इतर कर्मचाºयांच्या निदर्शनास आली तेव्हा गायकवाड याला पकडले़ याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली़ कारागृहातील कर्मचारी व पोलिसांनी गायकवाड याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे नक्षलवादी हे तरुणांना भरती करून कसे प्रशिक्षण देतात असा आशय असलेली एका वृत्तपत्राची बातमी आढळून आली़ तसेच त्याने त्याची आई व मुलींच्या नावे लिहिलेली एक चिठ्ठीही आढळून आली़ या चिठ्ठीत ‘मला तुमची खूप आठवण येत आहे़ पण आता माझी वाट पाहू नका. मी माझा मार्ग निवडला आहे़’ अशा आशयाचा मजकूर होता़ पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत गायकवाड याच्याबाबत पूर्ण माहिती घेत यासंदर्भात नक्षलवाद विरोधी अभियानाकडे अहवाल सादर केला आहे़ दरम्यान आधीच्या गुन्ह्यात गायकवाड याला अटक असल्याने दुसºया गुन्ह्यात वर्ग करून घेताना कोतवाली पोलिसांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे़
—-
कोण आहे पावलस गायकवाड ?
पावलस गायकवाड हा पाथर्डी येथील रहिवासी आहे़ तो सीआयएसएफमध्ये (सेंट्रल इंटस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) कार्यरत होता़ डिसेंबर २०१४ मध्ये त्याने त्याच्या पत्नीच्या माहेरच्या नातेवाईकांवर हल्ला केला होता़ याप्रकरणी त्याच्या पत्नीने पावलसविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल केली होती़ पावलस याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती़ जामीन न मिळाल्याने त्याला सीआरपीएफमधून बडतर्फ करण्यात आले़ सध्या तो जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे़