दशक्रिया विधीत वाटली वर्तमानपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:26+5:302021-02-24T04:22:26+5:30
कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील स्व. लक्ष्मण सानप हे मुंबई येथे कामाला होते. लहानपणापासून वर्तमान पत्रे वाचनाची त्यांना मोठी आवड ...
कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील स्व. लक्ष्मण सानप हे मुंबई येथे कामाला होते. लहानपणापासून वर्तमान पत्रे वाचनाची त्यांना मोठी आवड होती. मुंबई येथील काम संपल्यानंतर २५ वर्षांपूर्वी ते आपल्या गावी बक्तरपूर येथे आले. वर्तमानपत्रे वाचण्याची आवड असल्याने हातपाय चालत होते. तोपर्यंत स्वतः दररोज पाच किलोमीटर जाऊन वर्तमानपत्र आणत.
परंतु, कालांतराने थकल्यानंतर मुले वर्तमानपत्रे आणून देत. प्रसंगी वर्तमानपत्र आणण्यास उशीर झाला तर ते प्रचंड अस्वस्थ होत. १४ फेब्रुवारीला त्यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. विशेष म्हणजे या वयात त्यांची नजर चांगली असल्याने ते वाचनाचा छंद जोपासत होते. एकंदरीतच स्व. सानप यांनी वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत आपला वाचनाचा छद जोपासत नवीन पिढीला देखील वाचनाची आवड व्हावी, याचसाठी आपली इच्छा मुलांजवळ व्यक्त केली. मुलांनाही ती पूर्ण केली. त्यामुळे वाचन संस्कृती टिकावी यासाठी स्व. सानप यांनी एक प्रकारचा आदर्श घालून दिला आहे.
............
वडिलांना वर्तमानपत्र वाचनाची खूप आवड होती. प्रत्येक बातमी व माहिती ते बारकाईने वाचत होते. त्यातून आम्हालाही मार्गदर्शन करीत तसेच वर्तमान पत्रात नोकरी, शासकीय भरती याविषयी काही जाहिरात असल्यास त्याची गावातील तरुण मुलांना घरी जाऊन माहिती देत होते. त्यामुळे त्यांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी दशक्रिया विधीत वर्तमान पत्र वाटले.
-
भरत सानप, पोलीस पाटील, बक्तरपूर
.
२३- लक्ष्मण सानप - कोपरगाव