न्ख्रिसमसचा उत्साह शिगेला
By Admin | Published: December 22, 2015 11:03 PM2015-12-22T23:03:54+5:302015-12-22T23:11:27+5:30
अहमदनगर : ख्रिस्ती बांधवांच्या परमोच्च आदराचे प्रतीक असलेला नाताळ सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, ख्रिस्ती बांधवांच्या उत्साहाला उधाण आले आहे़
अहमदनगर : ख्रिस्ती बांधवांच्या परमोच्च आदराचे प्रतीक असलेला नाताळ सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, ख्रिस्ती बांधवांच्या उत्साहाला उधाण आले आहे़
नाताळ म्हणजे येशूचा जन्मोत्सव. हा सण नगर शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो़़ शहरातील ह्युम मेमोरियल चर्च, संत अन्ना चर्च, सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्च तसेच भिंगार येथील संत जॉन चर्च, क्राईस्ट चर्च आदी ठिकाणी नाताळानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ सर्व चर्चमध्ये साफसफाई आणि रंगरंगोटीची कामे करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़
चर्चमध्ये येशूच्या जन्माचा देखावा सादर केला जातो. तो तयार करण्याच्या आणि सजावटीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. चर्चमध्येच नव्हे तर अनेक ख्रिश्चन बांधव आपल्या घरी अथवा वसाहतीतही अशा प्रकारच्या जन्मोत्सवाच्या गव्हाणी तयार करतात. त्यांचीही तयारी सुरू आहे.
शहरातील भेटवस्तूंच्या दुकानांतही ख्रिसमसचा प्रभाव जाणवू लागला आहे. अनेक आकर्षक भेटवस्तू आणि शुभेच्छा कार्डस्, जिंगल बेल, ख्रिसमस ट्री ची प्रतिकृती, फुगे आणि अन्य सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तसेच खास ख्रिसमस केक, पेस्ट्रीज, चॉकलेट्सही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक वस्तूची किंमत त्याचा आकार आणि दर्जानुरूप आहे. अनेक दुकानदारांनी ख्रिसमससाठी फेस्टिव्हल आॅफर्स आणल्या आहेत. त्यामुळे सवलतीच्या दरातही साधने उपलब्ध आहेत.
(प्रतिनिधी)
ााताळात टोपी आणि सांताक्लॉजच्या मुखवट्यांना मोठी मागणी असते़ नगर शहरात आम्ही गेल्या सहा वर्षांपासून टोप्या विक्रीसाठी येतो़ दहा दिवस येथे चांगली विक्री होती़ या काळात पुढील दोन ते तीन महिन्यांचा रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागतो़ दिल्ली येथून माल खरेदी केला जातो़
-बाबुलाल बागरीया, विक्रेते.