निघोजच्या शेतकºयाने नांगरले झेंडुच्या फुलाचे शेत, बाजारपेठ बंद असल्याने घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 01:06 PM2020-04-19T13:06:12+5:302020-04-19T13:06:37+5:30
निघोज : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे व बाजारपेठा बंद असल्यामुळे झेंडूची फुले तोडण्यासाठी आलेल्या झेंडूची एक एकर शेती नांगरून टाकण्याची वेळ निघोज येथील शेतकरी कुशाबा भागाजी कवाद यांच्यावर आली आहे. यामुळे कवाद यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
भास्कर कवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
निघोज : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे व बाजारपेठा बंद असल्यामुळे झेंडूची फुले तोडण्यासाठी आलेल्या झेंडूची एक एकर शेती नांगरून टाकण्याची वेळ निघोज येथील शेतकरी कुशाबा भागाजी कवाद यांच्यावर आली आहे. यामुळे कवाद यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
निघोज येथील तुकाई मळा येथे दोनवषापूर्वी एक एकरमध्ये झेंडूची शेती होती. ठिबकद्वारे उत्तम प्रकारे ही बाग फुलवली होती. यापूर्वी दोनवेळा फुले तोडली मात्र तोडलेली फुले बाजारपेठेपर्यंत नेता आली नाहीत. त्यामुळे त्यांनी ही फुले रस्त्यावरच फेकून दिली होती. आता झेंडूची फुले तोडण्यास सुरवात केली होती. मात्र तोडलेली फुले विकायची कुठे ? असा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यामुळे एक एकरावरील झेंडूची फुले त्यांनी टॅँक्टरच्या सहाय्याने नांगरून टाकली आहेत. कुशाबा कवाद यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्यावतीने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. उपाययोजना म्हणून संचारबंदी, लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, बाजारपेठा थंडावल्या आहेत. पुणे-मुंबईसारख्या महतत्वाच्या बाजारपेठा सध्या बंद आहेत. त्यामुळे झेंडूसारखी फुले विकायची कुठे असा प्रश्न फुल् उत्पादकांसमोर पडला आहे.
-----------------------
कोट
सध्या उन्हाळा सुरू झाला असून पाण्याचा तुटवडा असताना देखील शेतकºयांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली. सध्या हातातोंडाशी आलेला घास कोरोनामुळे हिरावला आहे. सरकारने फूल उत्पादकांना मदत करावी.
-कुशाबा कवाद,फूल उत्पादक
--