टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीवर नीलेश लंकेंचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:22 AM2021-02-11T04:22:21+5:302021-02-11T04:22:21+5:30
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीवर आमदार नीलेश लंके पुरस्कृत ढोकेश्वर ग्रामविकास व अशोक कटारिया पुरस्कृत जनसेवा ...
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीवर आमदार नीलेश लंके पुरस्कृत ढोकेश्वर ग्रामविकास व अशोक कटारिया पुरस्कृत जनसेवा पॅनलने एकत्र येत वर्चस्व मिळविले. सरपंचपदी अरुणा खिलारी यांची तर उपसरपंचपदी सुनील चव्हाण यांची निवड झाली.
सरपंचपदासाठी अरुणा खिलारी व पूजा झावरे यांनी तर सुनील चव्हाण व किशोर गायकवाड यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज भरले होते. दुपारी मतदान झाले. यामध्ये लंके गटाच्या अरुणा खिलारी यांना १५ पैकी ९, तर पूजा नवीन झावरे यांना ६ मते मिळाली. सरपंचपदी अरुणा खिलारी निवडून आल्या. उपसरपंचपदासाठी कटारिया गटाचे सुनील चव्हाण यांना ९ तर किशोर गायकवाड यांना ६ मते मिळाली. सुनील चव्हाण उपसरपंच झाले.
ढोकेश्वर ग्रामविकास पॅनलला १० तर विरोधी जनसेवा पॅनलला ५ जागा मिळाल्या; मात्र जिल्हा बँकेमध्ये महाविकास आघाडी झाल्यामुळे तोच फॉर्म्युला ग्रामपंचायतीत राबविला गेला. महाविकास आघाडीमध्ये ढोकेश्वर ग्रामविकास पॅनलचे दत्ता निवडुंगे, प्रियंका सोमनाथ बांडे, अरुणा प्रदीप खिलारी, सुग्राबी कादर हावलदार हे चार व जनसेवा पॅनलचे रामदास किसन तराळ, शुभम सुनील गोरडे, सुनीता जयसिंग झावरे, गंगाधर बाळू निवडुंगे, सुनील हरिभाऊ चव्हाण हे सरपंच निवडीवेळी एकत्र आले. त्यांनी ढोकेश्वर पॅनलचे शिवाजी सीताराम खिलारी, पूजा नवीन झावरे,
अर्चना बापूसाहेब रांधवन, किशोर शिवाजी गायकवाड, सुमन दीपक साळवे,
कमल भाऊसाहेब खिलारी अशा सहा जणांना सत्तेपासून दूर ठेवले.
चौकट...
अशोक कटारिया ठरले किंगमेकर
१५ जागांपैकी ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी व आमदार नीलेश लंके यांच्या ढोकेश्वर ग्रामविकास पॅनलला १० तर अशोक कटारिया यांच्या जनसेवा पॅनलला ५ जागा मिळाल्या होत्या; मात्र अशोक कटारिया यांनी महाविकास आघाडी करत लंके यांना बरोबर पाच व चार अशा नऊ जागांसह ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले. येथे कटारिया किंगमेकर ठरले.
फोटो...
१० अरूणा खिलारी
१० सुनील चव्हाण