निलेश लंके यांचा आठवडेबाजारात शेतक-यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 03:29 PM2019-10-14T15:29:54+5:302019-10-14T15:31:19+5:30
राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी रविवारी बाजारातून फेरी काढण्यात आली. यावेळी खेड्यापाड्यातून आलेल्या मतदारांशी संवाद साधण्यात आला.
पारनेर : राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी रविवारी बाजारातून फेरी काढण्यात आली. यावेळी खेड्यापाड्यातून आलेल्या मतदारांशी संवाद साधण्यात आला. लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी पारनेर शहरात सभा घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीने घरोघर जाऊन प्रचारावर भर दिला आहे. बाजाराचा दिवस असल्याने रविवारी शेतक-यांशी संवाद साधण्यात आला.
या प्रचार फेरीत अपंग विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, नंदकुमार औटी, सुभाष औटी, सुरेश औटी, मेजर पोटघन, सनी थोरात, जितेश सरडे, दत्ता कावरे यांसह अनेककार्यकर्ते उपस्थित होते.
पारनेर मतदारसंघात खातगाव टाकळी, देहरे, कण्हेर, दैठणे गुंजाळ, टाकळी ढोकेश्वर, ढोकी आदी गावात रविवारी लंके यांच्या प्रचारासाठी फेरी व सभा घेण्यात आल्या.
साहेब आम्हाला माफ करा
पारनेरच्या प्रचार फेरीत अपंग विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक हेही सहभागी झाले होते. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रतिक्रियेत धात्रक यांनी म्हटले आहे, मी शिवसैनिक म्हणूनच लंके यांच्या प्रचारात उतरलो आहे. लंके यांनी सेनेसाठी जिवाचे रान केले. पण, त्यांच्यावर पक्षाने अन्याय केला. त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. ते राष्ट्रवादीचे उमेदवार असले तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. याबाबत उद्धव ठाकरे आम्हाला माफ करतील.