निळवंडेची कालवे खोदाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:27 PM2019-06-13T13:27:16+5:302019-06-13T13:27:21+5:30

बहुचर्चित निळवंडे धरणाच्या ० ते ३ किलोमीटर दरम्यान प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास जवळपास ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी निर्विघ्न सुरुवात झाली.

Nilvanday canal dug continues | निळवंडेची कालवे खोदाई सुरू

निळवंडेची कालवे खोदाई सुरू

अकोले : बहुचर्चित निळवंडे धरणाच्या ० ते ३ किलोमीटर दरम्यान प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास जवळपास ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी निर्विघ्न सुरुवात झाली. लाभक्षेत्रातील आवर्षण प्रवणभागात आनंदोत्सव साजरा झाला.
मंगळवारी (दि.११) मंत्रालयात झालेल्या चर्चेनुसार निळवंडेचे कालवे प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बुधवारी पोलीस बंदोबस्तासह कालवे खोदण्यास सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत निळवंडेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या पायथ्या-पासून ‘खोंडवस्ती ते तिटमेवस्तीपर्यंत’ तीन किलोमीटरपर्यंतचे कालवे खोदाईचे काम प्रगतीपथावर होते. शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतातील भूईमूग, वालवडसारखी पिके काढून घेतली. ऊस चाºयासाठी कापून नेला आणि प्रशासनाला सहकार्य केले.
शेतकऱ्यांचा जवळपास सर्व विरोध मावळल्याचे चित्र होते. गेली दोन, चार दिवस निळवंडे धरण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. राखीव दलाचे १०० जवान तसेच स्थानिक पोलीस बुधवारपर्यंत होते. मुंबई येथे मंगळवारी अकोलेतील प्रकल्पग्रस्त शेतकºयांसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली.
माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, कैलास वाकचौरे, अशोक भांगरे, सुनीता भांगरे, डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यातील बहुतांश मागण्या या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे समजते.
बुधवारी पाटबंधारे-जलसंपदाच्या अधिकाºयांनी दोन पोकलेन, चार टिपर, डंपर, जेसीबी आदींसह कालवे खोदाईच्या कामाला गती दिली. कृषी विभागाचे अधिकारी एल. एन. नवले व त्यांच्या सहकाºयांनी शेतात उभ्या असलेल्या पिकांचे पंचनामे केले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,
कार्यकारी अभियंता भरत शिंगाडे, उपअभियंता मनोज डोके, रोहित कोरे, तहसीलदार मुकेश कांबळे व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख दिवसभर निळवंडे धरण परिसरात थांबून होते.

आमची खोंड कुटुंबाची ३५ खातेदारांची ११ एकर जमीन वीजनिर्मिती गृहासाठी संपादित केली आहे. त्याचा काही मोबदला मिळणे बाकी आहे. सध्या शेतात भूईमूगाचे पीक आहे. काही पीक घाईने काढले. काहीवर पोकलेन फिरला. त्यावर जेसीबीने कालव्याची माती पडली. हे पाहून दु:ख झाले पण दुसरीकडे कुणीतरी या पाण्यातून उभे राहिल, त्यांचा प्रपंच फुलेल याचाही आनंद आहे. -शरद खोंड, प्रकल्पग्रस्त शेतकरी

खोंड कुटुंबाची ११ एकर जमीन संपादित केली आहे. नियमानुसार त्यांना मोबदला दिला जाईल. कालवेग्रस्तांचे उर्वरित प्रश्नही मार्गी लावू. कालवेग्रस्त शेतकºयांचा विरोध मावळला आहे. कालवे खोदाईचे काम सुरळीत सुरू आहे. आवश्यक तितकीच जमीन सध्या रेखांकित केली आहे. कालवे तयार होऊन उरणारी जमीन शेतीच्या मूळ मालकाला भाडेतत्त्वावर कसण्यासाठी देण्याचा शासनाचा विचार आहे. -डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय अधिकारी

Web Title: Nilvanday canal dug continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.