निळवंडे धरण भरले ५० टक्के, भंडारदरा ३४ टक्के भरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 11:12 AM2020-07-09T11:12:30+5:302020-07-09T11:13:02+5:30

राजूर : भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रा बरोबर कळसुबाई शिखर परिसरात पावसाचे सातत्य टिकून आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी निळवंडे धरण निम्मे (५० टक्के) भरले तर भंडारदरा धरण ३४ टक्के भरले.

Nilwande dam is 50 per cent full and reservoir is 34 per cent full | निळवंडे धरण भरले ५० टक्के, भंडारदरा ३४ टक्के भरले 

निळवंडे धरण भरले ५० टक्के, भंडारदरा ३४ टक्के भरले 

राजूर : भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रा बरोबर कळसुबाई शिखर परिसरात पावसाचे सातत्य टिकून आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी निळवंडे धरण निम्मे (५० टक्के) भरले तर भंडारदरा धरण ३४ टक्के भरले.


    मागील वर्षी नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे सर्वच धरणे काठोकाठ भरली होती. त्यातच दोन्ही धरणांच्या लाभक्षेत्रात पाण्याची मागणीही काही प्रमाणात कमी होती. त्यामुळे या वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणांमध्ये मुबलक पाणी साठा शिल्लक होता.निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले अखेरचे आवर्तन २२ जून रोजी बंद झाले. त्यावेळी या धरणातील पाणीसाठा ३ हजार ५०१ दशलक्ष घनफुट इतका होता.
    या वर्षी भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रा बरोबर लाभ क्षेत्रातही पावसाचे आगमन लवकर झाले. काही दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाचे सातत्य टिकून असल्याने भंडारदरा आणि निळवंडे धरणांत नवीन पाण्याची आवकही सुरु झाली. कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांतही पावसाचे सातत्य टिकून असल्याने प्रवरेची उपनदी म्हणून समजली जाणारी कृष्णावंती प्रवाही झाली आणि याच उपनदीवर वाकी येथे बांधण्यात आलेला ११२ दशलक्ष घनफुट क्षमतेचा पाझर तलाव मंगळवारी सकाळी भरून वाहू लागला. या तलावावरून २५६ कुसेक्सने पाणी नदी पात्रात झेपावत होते.या पाण्याबरोबर भंडारदरा धरणाच्या खालील परिसरातील सर्व पाणी निळवंडे जलाशयात येत असते.गुरुवारी सकाळी निळवंडे धरणात ४५ दशलक्ष घनफुट पाणी नव्याने आले आणि ८ हजार ३२० दशलक्ष घनफुट क्षमतेच्या निळवंडे धरणातील पाणीसाठा ५० टक्के झाला. गुरुवारी सकाळी सहा वाजता यातील पाणीसाठा ४ हजार १६४ दशलक्ष घनफुट इतका झाला होता.

    दरम्यान भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी अंतरा अंतराने पडत असल्याने ओढे नाले प्रवाही झाले आहेत.त्यामुळे गुरुवारी सकाळी या धरणात २२३ दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक होत धरणातील पाणीसाठा ३ हजार ७६० दशलक्ष घनफुट झाला आणि धरणातील एकूण पाणीसाठा ३४ टक्क्यांहून अधिक झाला.

    गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत नोंदला गेलेला पाऊस मिलिमीटर मध्ये पुढील प्रमाणे,कंसात या मोसमात पडलेला पाऊस:-रतनवाडी57(९५७),  घाटघर ६७(१३२२), पांजरे ५२(८५३) ,भंडारदरा ४५(६९७), वाकी ४०(५४८), निळवंडे ५(४१७)

Web Title: Nilwande dam is 50 per cent full and reservoir is 34 per cent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.